Red Chili Powder: 'या' पद्धतीचा वापर करून ओळखा लाल तिखटामधील भेसळ

Red Chili Powder: आजकाल मसाल्यांमध्ये सर्रास भेसळ होताना दिसत आहे. याचे आरोग्यावर नकार्तमक परिणाम पाहायला मिळतात. यामुळे घरीच लाल तिखटामधील भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेऊया.
Red Chilli Powder:
Red Chilli Powder: Sakal
Updated on

Red Chili Powder: आजकाल खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाणा वाढले आहे. मसाल्यांमध्ये देखील भेसळ होत आहे. कोणतेही खाद्यपदार्थ बनवताना लाल तिखट वापरले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की पॅकेज केलेल्या मसाल्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यात लाकूड भुसा, विटांची पावडर आणि अनेक रंग मिक्स केले जातात.यामुळे पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सांगितले की, भेसळयुक्त लाल तिखट कसे ओळखाल.

मसाल्याच्या पावडरमध्ये भेसळ का केली जाते?

मसाल्याच्या पावडरमध्ये भेसळ केली जाते कारण त्याचे प्रमाण जास्त दिसावे आणि त्याचा रंग अधिक दडद दिसावा. लाल तिखटामध्ये वीटाची पावडर, मीठ किंवा टॅल्क पावडर मिक्स केले जाते.

लाल तिखटामध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ केली जाते?

मिरची पावडरमध्ये लाल वीटांची पावडर मिसळली जाते. या पावडरचा रंग आणि पोत लाल तिखटासारखाच असतो. म्हणूनच ते अनेकदा मिसळले जाते. असे तिखट शरीरात गेल्यास पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Red Chilli Powder:
Gardening Tips: पावसाळ्यात घरातील बगीचा राहील हिरवागार, फक्त फॉलो करा 'या' छोट्या टिप्स

कसे ओळखावी भेसळ?

एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा लाल तिखट पावडर घाला. काही वेळाने पाण्यात विरघळलेली पावडर चोळा.

त्यानंतर त्यात वीट किंवा वाळू दिसेल.

जर ते गुळगुळीत दिसत असेल तर त्यात साबण मिसळलेला असतो.

मिक्स केलेला कृत्रिम रंग कसा ओळखाल?

एक ग्लास पाणी घेऊन त्यात लाल तिखट पावडर टाका.

त्यात रंगीत तरल दिसले तर पावडरमध्ये भेसळ आहे.

लाल तिखट अनेकदा पाण्यात विरघळते.

लाल तिखटमध्ये स्टार्च मिसळले आहे की नाही हे शोधण्यासाठी, त्यात आयोडीनच्या टिंचरचे काही थेंब घाला.

जर त्याचा रंग निळा असेल तर त्यात स्टार्च मिसळला आहे समाजावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com