Cleaning Hacks : फोन कव्हर कसे स्वच्छ करावे? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

फोनचे कव्हर कसे करावे स्वच्छ. जाणून घ्या
Mobile case cleaning hacks
Mobile case cleaning hacksSakal

लोक घरात असलेल्या अनेक वस्तूंना खराब झाले की फेकून देतात, जे योग्य नाही. जसे की फक्त फोनचे कव्हर. लोक अनेकदा फोन कव्हर घाण झाला की ते फेकून देतात आणि नवीन खरेदी करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, फक्त 1 रुपयात खराब झालेले फोन कव्हर साफ करता येते. कव्हर्स साफ करण्याचे सोपे हॅक्स आम्ही तुम्हाला सांगतो.

फोन कव्हर कसे स्वच्छ करावे?

जर तुम्ही फोनचे घाणेरडे कव्हर फक्त पाण्याने स्वच्छ केले तर त्याचा फारसा फायदा होणार नाही. कव्हर स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला शॅम्पूची आवश्यकता आहे. तुमचे घाण झालेले कव्हर1 रुपये किमतीच्या शॅम्पूने स्वच्छ होईल आणि कोणताही खर्च होणार नाही.

फोनचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला कोमट पाणी घ्यावे लागेल. या पाण्यात शॅम्पूचे पूर्ण पाऊच टाका. यानंतर फोनचे कव्हर काढून पाण्यात टाका. हे केल्यानंतर, आपल्याला 15 मिनिटांसाठी कव्हर पाण्यात सोडावे लागेल.

आता एका भांड्यात बेकिंग सोडा टाका आणि त्यात थोडे पाणी घालून लिक्विड तयार करा. आता हे लिक्विड कापसाच्या मदतीने कव्हरवर लावा आणि कव्हर स्वच्छ करा. असे केल्याने तुमचे कव्हर चमकेल. (How to clean phone cover?)

Mobile case cleaning hacks
Kitchen Hacks: आता दूध उतू जाणार नाही; फक्त ट्राय करा या ट्रिक्स

यासोबतच तुम्ही टूथपेस्टचा वापर कव्हर साफ करण्यासाठी करू शकता. यामुळे कव्हर सहज स्वच्छ होईल, जे तुम्ही सहजपणे पुन्हा वापरू शकता.

फोन कव्हर घाण का होते?

फोन कव्हर घाण होण्यामागे अनेक वेगवेगळे कारणे असू शकतात. आपल्या फोनचे कव्हर अन्न, तेलाचे डाग आणि घाण हात या कारणांमुळे घाण होते. (Why does the phone cover get dirty?)

Mobile case cleaning hacks
Toilet Cleaning : कितीही स्वच्छ केलं तरी टॉयलेटमधला वास काही जात नाही, या ट्रिक्स वापरून पहा, फरक जाणवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com