White Shoes Strain Hacks: मळकट झालेले पांढरे शूज घरच्या घरी करा साफ, फक्त 2 मिनिटांत होतील स्वच्छ

पांढऱ्या शूजवरील हट्टी डाग कसे काढायचे असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर या हटके टिप्स वापरून पाहा
White Shoes Strain Hacks
White Shoes Strain HacksEsakal

पांढऱ्या रंगाचे शूज हे आता स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. प्रत्येक रंगाच्या कपड्यावर या रंगाचे शूज शोभून दिसतात. तसंच, मुलांसह मुलीही पांढरे शूज वापरु शकतात. वनपीस, जंपसूट ते जीन्सवरही हे या रंगाचे शूज उठून दिसतात. 

सर्वोत्कृष्ट लुक मिळवण्यासाठी आपण अनेक नवीन ट्रेंडच्या गोष्टी ट्राय करत असतो. यामध्ये आणखी एक ट्रेंड असतो तो म्हणजे लेदरच्या वस्तू बाळगणे. सध्याच्या पिढीतील हा एक फॅशन ट्रेंडचा भाग बनला आहे.

यापैकी बहुतेक लोक स्मार्ट आणि कूल दिसण्यासाठी लेदर जॅकेट, वॉलेट आणि शूज घालणे पसंत करतात. एखाद्या ब्रॅंडेड कंपनीचे कपडे, शूज, जॅकेट घातल्याने आपला लुकही तसा ब्रॅंड दिसतो.

अनेकांना या वस्तूंमध्ये पांढऱ्या रंगाचे वेड असते. पांढऱ्या रंगाच्या लेदरच्या शूजचे वेड बऱ्याच तरुणांनना असते. कारण या पांढऱ्या रंगाच्या लेदर शूज प्रत्येक लूकमध्ये सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. परंतु लोकांना ते स्वच्छ करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत काही टिप्स वापरून तुम्ही पांढरे लेदर शूज सहज चमकवू शकता.

जेव्हा सामान्य शूज घाण होतात तेव्हा ते सहजपणे धुवून स्वच्छ करुन वाळवता येतात. परंतु जर चामड्याच्या शूज पाण्यात पडले किंवा ते पाण्याच्या संपर्कात आले तर खराब होण्याची शक्यता वाढते. पांढऱ्या चामड्याचे शूजही लवकर घाण होतात.

अशावेळी पाण्याशिवाय शूज साफ करणे कठीण असते. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या चामड्याचे शूज चमकण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांत तुम्ही शूज स्वच्छ करु शकता आणि नव्या सारखे चकचकित दिसतील.

White Shoes Strain Hacks
Lemon Hacks : तुमच्या छोट्या कामात मोठी मदत करतो लिंबू, घर चकचकीत करण्यासाठी असा करा वापर

टूथपेस्टने स्वच्छ करा

लेदर शूज स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट हा एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र, जेल बेस्ड टूथपेस्टने लेदर शूज खराब होण्याची भीती असते. शूज स्वच्छ करण्यासाठी, सामान्य टूथपेस्ट वापरा, म्हणजे रंग नसलेली टूथपेस्ट जिचा रंग फक्त पांढरा असेल अशी कोणतीही टुथपेस्ट तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमचे शूज सहज चमकतील.

पॅच चाचणी करा

पांढऱ्या लेदरच्या शूजवर टूथपेस्ट लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. अर्थात, टूथपेस्टमध्ये असलेले घटक शूज स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहेत का याची खात्री करुन घ्या. शिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक टूथपेस्टमधील रसायने शूज खराब करू शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया सांभाळून करा. टूथपेस्ट घेऊन बुटावर लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ करा. आता शूजवर टूथपेस्टचा डाग नसेल तरच वापरा.

शूज सुकवायला विसरू नका

पांढऱ्या चामड्याचे शूज स्वच्छ केल्यानंतर ते सुकवणेही खूप गरजेचे आहे. यासाठी बुटावर स्वच्छ कापड लावून हलके दाबावे. याच्या मदतीने कापड शूजमधील ओलावा शोषून घेईल आणि शूज लगेच कोरडे होतील. तुमच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार तुम्ही हे शूज काहीवेळ उन्हात ठेवूनही नैसर्गिकरित्या सुकवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com