सॅनिटरी पॅडचा कचरा टाळा;आता वापरा झिरो वेस्ट पीरियड किट|Women Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅनिटरी पॅडचा कचरा टाळा;आता वापरा झिरो वेस्ट पीरियड किट
सॅनिटरी पॅडचा कचरा टाळा;आता वापरा झिरो वेस्ट पीरियड किट

सॅनिटरी पॅडचा कचरा टाळा;आता वापरा झिरो वेस्ट पीरियड किट

आपण सर्वजण हवामान बदलामुळे चिंतेत आहोत. हवामान बदलाचे आणखी एक कारण म्हणजे साचणारा कचरा. ज्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. जागतिक बँकेच्या व्हॉट अ वेस्ट 2.0: अ ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टू 2050 या ताज्या अहवालानुसार पुढील 30 वर्षात कचऱ्याची जागतिक निर्मिती 3.4 अब्ज टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सॅनिटरी पॅड्स मुळे होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण त्यात जास्त असेल.

त्यामुळे पुढे येणारा धोका टाळण्यासाठी महिला, मुलींनी मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्स वापरणे बंद करणे गरजेचे आहे. यासाठी झीरो-वेस्ट पिरियड किट तयार करणे गरजेचे आहे. , फॅबपॅडच्या श्रीप्रिया ढेलिया यांनी झिरो-वेस्ट पिरियड किट आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असून कचराशून्य प्रक्रिया असल्याचे सांगितले आहे. ही सर्व कीट पाच वर्षे वापरू शकता.

मेंस्ट्रुअल कप- मासिक पाळीच्या कालावधीत वापरायला अतिशय चांगला आणि पुर्नवापर करता येईल असा मेंस्ट्रुअल कप आता अनेक महिला वापरू लागल्या आहेत. हा कप सिलिकॉन पासून बनतो. तो वापरताना आधी गरम पाण्यात ठेवून सॅनीटाईज करायचा. पाळी आल्यावरच तो योनीमार्गात घालायचा. दिवसातून 2 ते 3 वेळा काढून तो पाण्याखाली स्वच्छ करून पुन्हा वापरायचा. पाळी पूर्ण झाल्यावर तो पुन्हा गरम पाण्याने धुवून, पुसून कपाटात कीटमध्ये ठेवून द्यायचा. पुनर्वापर करता येत असल्याने पुढच्या महिन्यात पाळी आली की पुन्हा अशाच पद्धतीने तो वापरता येतो. तुम्ही  पाळीच्या काळात हा कप वापरून कुठेही बिनधास्त हिंडू फिरू शकता.

पाळीसाठी असणारी अंडरवेअर- नेहमीच्या अंडरवेअर सारखीच ही अंडरवेअर दिसते. त्याला पिरियड अंडरवेअर म्हणतात. यासाठी पातळ फेब्रिकचे स्तर जरी असले तरी रक्त सांडणार नाही अशापद्धतीने तिची रचना असते. त्यामुळे रक्त ती चांगल्या प्रकारे शोषून घेते. पण ती योग्यप्रकारे वापरली गेली पाहिजे. तरच दीर्घकाळ टिकतात. प्रत्येकवेळा वापरून झाली की कोमट पाण्यात स्वच्छ धुवुणे गरजेचे आहे.

पुन्हा वापरता येतील असे पॅड्स- जर तुम्हाला मेंस्ट्रुअल कप वापरणे सोयीचे वाटत नसेल. तर पुन्हा वापरता येण्याजोगे पॅड्सही आता उपलब्ध असून तो एक चांगला पर्याय आहे. सुती कापडापासून ते तयार केलेले असल्याने मऊ असतात. त्यामध्ये कोणतीही घातक रसायने, परफ्यूम, प्लास्टिक किंवा ब्लीच नसतात. इको-फ्रेंडली असल्याने कधीही वापरता येऊ शकतात. मात्र सुती असल्याने ते साध्या पाण्याने स्वच्छ धुवावे लागतात.

पॅंटी लायनर्स- अनेकजण आजकाल मेंस्ट्रुअल कप किंवा कापडी पॅड वापरत असले तरी पाळीच्या शेवटी पॅंटी लायनर्स वापरतात. काहीजण जवळपास दररोज पँटी लाइनर वापरतात. पण, त्याऐवजी कापड पँटी लाइनर वापरण्याचा विचार करा. हे केमिकलमुक्त असून वापरण्यास सोपे आहे. तसेच कचराही होत नाही. मात्र नीट काळजी घेणे गरेजेचे आहे.

loading image
go to top