Juiciest Lemon: उन्हाळ्यात सरबताची मजा औरच.. मात्र त्यासाठी रसाळ लिंबू कसा ओळखावा? लक्षात ठेवा 'या' 5 टिप्स

how to find out Juiciest lemon in summer: उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. पण बाजारातून रसाळ लिंबू खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
Juiciest Lemon
Juiciest LemonSakal

उन्हाळ्यात लिंबूचे सेवन करणे फायदेशीर असते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. लिंबूपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच उन्हाळ्यात जेवणाची चव देखील वाढवते. पण अनेक लोकांना बाजारात गेल्यावर रसाळ लिंबू कसा ओळखावा हे कळत नाही. यासाठी पुढील टिप्सची मदत घेऊ शकता.

रसाळ लिंबाची ओळख कशी कराल?

लिंबाची साल

लिंबाची साल गुळगुळीत, चमकदार आणि टणक असेल तरच खरेदी करावा. अशा लिंबामध्ये रस देखील जास्त असतो. पण लिंबावर डाग आणि दिसायला शिळा असेल तर तो खरेदी करू नका.

हलके पिळावे

रसाळ लिंबू खरेदी करण्यापुर्वी लिंबू थोडा दाबून किंवा पिळून पाहावा. जर लिंबू पिकलेला आणि रसाळ असेल तर तो चांगला आहे. जर लिंबू कडक असेल तर तो कडक असतो. यामुळे बाजारात गेल्यावर लिंबाला पिळून किंवा दाबून पाहावे आणि मगच खरेदी करावा.

लिंबाचा रंग

लिंबाचा रंग पाहून देखील रसाळ लिंबू खरेदी करू शकता. यामुळे हिरव्या रंगाचा लिंबू खरेदी करणे टाळावा. कारण लिंबू पिकलेला नसेल तर त्यात रस नसतो. पिकलेल्या लिंबाचा रंग हा थोडा पिवळा आणि चमकदार असतो.

Juiciest Lemon
Summer Care: उन्हाळ्यात लहान मुलांना एसी अन् कुलरमध्ये झोपवत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी

लिंबाचे वजन

रसाळ लिंबू खरेदी करताना वजन देखील तपासावे. दोन समान आकाराचे लिंबू असेल तर हातात घेऊन पाहावे आणि जो लिंबू वजनाने जड असेल तो खरेदी करावा. कारण वजनाने जड असलेल्या लिंबामध्ये रस जास्त असतो.

या गोष्टी ठेवा लक्षात

सेद्रिंय लिंबू रसाळ आणि चवदार असतात. असे लिंब कृत्रिम कीटकनाशके आमि रसायनांपासून मुक्त असतात. यामुळे अशा लिंबाचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

बाजारात सर्वात रसाळ लिंबू मिळाल्यास त्याच्या चवीचा आनंद घेऊ शकता. तसेच उन्हाळ्यात रसाळ लिंबापासून लोणचं, सरबत यासारखे पदार्थ बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com