जळलेली भांडी साफ करण्यासाठी कांद्याचा होईल वापर; कसा ते पाहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kitchen tips

आज आम्ही गृहीणींसाठी एक महत्वाची आणि उपयोगी गोष्ट सांगणार आहोत.

जळलेली भांडी साफ करण्यासाठी कांद्याचा होईल वापर; कसा ते पाहा...

गृहीणींना अनेकवेळा करपलेली किंवा जळलेली भांडी घासणे म्हणजे कंटाळवाणे काम वाटते. त्यामुळे आज आम्ही गृहीणींसाठी एक महत्वाची आणि उपयोगी गोष्ट सांगणार आहोत. घरी उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापराने तुम्ही अशी जळलेली भांडी घासण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता. यामुळे जळलेली भांडी पुन्हा एकदा पहिल्यासारखी होतात.

कांद्यांचे घरगुती उपाय

गृहिणींना रोजच्या कामात अनेक छोट्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातीलच एक म्हणजे जळलेले भांडे स्वच्छ करणे. किचनमधील कामाच्या ओघात अनेकवेळा आपण भाजी, तांदूळ किंवा दूध असे काही पदार्थ गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेले असते. मात्र कामाच्या घाईत आल्यानं गॅस बंद करण्यास विसरतो.

हेही वाचा: Sperm Donor : 48 मुलांचा बाप पण अजूनही आहे सिंगल, लग्नासाठी पोरी तयार नाहीत

यावेळी बराच वेळ ते भांडे गॅसवर राहिल्याने त्यातील पदार्थ जळून जातात आणि ते भांडे काळे होते. अशावेळी ते डाग घालवण्यासाठी घाम येईपर्यंत त्याला घासावे लागते. दरम्यान, ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण कांद्याचा वापर करून बर्न स्पॉट्स दूर करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

हेही वाचा: लिव्हर मजबूतीसाठी 5 प्रकारचे ज्यूस आवश्यक, बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

जळलेली भांडी कशी स्वच्छ करावी?

  • जळलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी सर्व प्रथम कांदा सोलून घ्या. यानंतर जळलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर ब्रशच्या किंवा भांड्याच्या चोथ्यानेन ते भांडे घासून घ्या. यानंतर कांद्याचे दोन तुकडे करा आणि तव्यावर घासून घ्या. आता जळलेल्या भांड्यात पाणी टाकून १५ मिनिटे ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

  • व्हिनेगर आणि कांदा वापरल्यानेही जळलेल्या भांड्यांपासून सुटका होऊ शकते. फक्त अर्धा कप व्हिनेगर, अर्धा कप कांद्याचा रस एका वाटीत मिसळा, नंतर जळलेल्या भांड्यात ठेवा.

  • यानंतर दहा मिनिटे असेच राहू द्या. यानंतर गॅसवर जळलेले भांडे मिश्रणाने शिजवून घ्या. 2 मिनिटांनंतर ते काढा आणि ब्रशने घासून घ्या. तुमचे भांडे स्वच्छ आणि चमकदार दिसेल.

  • जळलेले भांडे स्वच्छ करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे त्याची साल. कांद्याची साल एका जळलेल्या खराब भांड्यात टाकून २० ते ३० मिनिटे पाण्याने उकळा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. मग तुम्ही पहिल्यानंतर अशी भांडी अधिक चमकदार दिसतील.

Web Title: How To Get Burnt Utensils At Home Tips Lifestyle For Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylekitchen