Smooth Hair: फ्रिजी अन् रफ केसांना मिनिटांमध्ये करा स्मुथ, 'या' पाच सोप्या ट्रिक्स करा फॉलो |HairCare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smooth Hair:

Smooth Hair: फ्रिजी अन् रफ केसांना मिनिटांमध्ये करा स्मुथ, 'या' पाच सोप्या ट्रिक्स करा फॉलो

स्त्रियांचं सौंदर्य हे केसांवर अवलंबून असतं, असं म्हटल्या जाते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला फ्रिजी अन् रफ केसांमुळे दिसून येतो.

केसांची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला पाच सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज केसांची काळजी घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया.

हेअर मुस वापरा

जर तुम्हाला तुमच्या केसांचा कुरळेपणा किंवा फ्रिजीनेस काढायचा असेल तर Hair mousse हा उत्तम मार्ग आहे. सुरवातीला ओल्या हातावर mousse घासा आणि केस आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. यामुळे तुमचे केस त्वरीत सॉफ्ट होतील.

हेअर सीरम लावा

केसांचा कुरळेपणा दूर करण्यासाठी हेअर सीरम हा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या केसांमध्ये ओलावा वाढतो. केस सॉफ्ट आणि चमकदार बनवतात. पण सीरम निवडताना तुमच्या केसांना योग्य असणारे सीरम निवडा. केस धुतल्यानंतर जर तुम्ही सीरम लावत असाल तर उत्तमच आहे कारण अस्वच्छ केसांवर कधीच सीरम लावू नये.

हेही वाचा: Hair Care : केस धुताना ही काळजी नक्की घ्या...

हेअरस्प्रे-टिश्यू पेपर चा वापर करा

हे स्मार्ट फ्रिज-बस्टिंग हॅक सध्या खूप ट्रेडींगवर आहे. यासाठी तुम्हाला फक्त हेअरस्प्रे आणि टिश्यू पेपरची गरज आहे. हातावर एक स्ट्रॉंग-होल्ड हेअर स्प्रे स्प्रिट्ज करा आणि हेअर फ्रिज करा. त्यावर टिश्यू पेपर क्लिपच्या साहाय्याने लावा.

फ्लेक्ससीड जेल ट्राय करा

फ्लॅक्ससीड जेल हा केसांचा फ्रिजीनेस कमी करण्यासाठी चांगला मार्ग आहे. यातील फॅटी अॅसिडस् हायड्रेशन पातळी वाढवतात, ज्यामुळे केस क्षणार्धात सॉफ्ट होतात. कुरळे केसांसाठी हे विशेषतः चांगले आहे. सुरवातीला तुमच्या हातावर जेल घासून घ्या आणि स्क्रंचिंग मोशनने ते तुमच्या केसांवर लावा.

हेही वाचा: Hair Care : केस धुताना ही काळजी नक्की घ्या...

स्पूली हॅक ट्राय करा

जर तुम्हाला हेअर जेल किंवा हेअर स्प्रे वापरायला आवडत नाही? तर स्पुली हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्पूलीचा वापर करुन तुम्ही झटपट सिल्क सॉफ्ट केस लूक मिळवू शकता. यासाठी फ्लायवेनी स्पुली केसांवर खाली घासून घ्या.