Selfish People : स्वार्थी लोकांना कसं ओळखायचं? तुमच्याही आजूबाजूला आहेत का अशी लोकं?

आज आपण स्वार्थी लोकांना कसं ओळखायचं, हे जाणून घेणार आहोत.
Selfish People
Selfish People sakal
Updated on

आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोकांमध्ये वावरत असतो. ऑफीस, घर, नातेवाईक, मित्रमंडळी या लोकांमध्ये वावरत असताना अनेकदा बरेच चांगले वाईट अनुभव येतात. कधी कधी आपण समोरच्याला दोष देतो तर कधी कधी समोरचा आपल्याला दोष देतो. मुळात सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्ही समोरच्याला खूप जवळचा व्यक्ती समजता आणि ते ऐनवेळी स्वार्थीपणा दाखवतात.

आज आपण स्वार्थी लोकांना कसं ओळखायचं, हे जाणून घेणार आहोत. जर तुमच्याही आजूबाजूला स्वार्थी लोक असेल तर अशा लोकांना कसं ओळखायचं जाणून घ्या. (how to identify selfish people read story)

स्वार्थीपणा दोन प्रकारचा असतो?

पहिल्या स्वार्थीपणामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही तर दुसऱ्या स्वार्थीपणात दुसऱ्याच्या नुकसानीचा काडीमात्र विचार केला जात नाही. आज आपण दुसऱ्या प्रकाराविषयी जाणून घेणार आहोच.

Selfish People
Heart Attack : 'या' तीन चुकीच्या गोष्टीमुळे कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; हे वाचाच

स्वार्थी लोक कसे ओळखायचे?

  • स्वार्थी वृत्ती असणाऱ्या लोकांना ओळखायची सोपी पद्धत जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण येते.

  • स्वार्थी व्यक्ती हे चुगलखोर स्वभावाचे असतात. स्वत:चा हेतू साध्य करण्यासाठी तुमच्या काही सीक्रेट गोष्टीही ते इतरांना सांगतात.

  • स्वार्थी व्यक्ती हे तुम्हाला नेहमी मदत करण्याचा आव आणतात पण जेव्हा प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ येते तेव्हा ते कुठलेही कारण सांगून मदत करण्यास टाळतात.

Selfish People
Female Psycology : महिला पुरुषांचे कपडे का घालतात? हे आहे लॉजिक
  • स्वार्थी व्यक्ती स्वत:चा फायदा कशात होतो, याचा विचार करतात.

  • जेव्हा स्वार्थी व्यक्तीला तुमच्याकडून कोणते काम काढून घ्यायचे असेल तर तुमची चापलूसी करायला सुरवात करतो.

  •  काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील हे पण सांगता येतं नाही.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com