

Diwali Pet Care Tips
sakal
HOW TO REDUCE FIREWORK ANXIETY IN PETS: दिवाळीचा सण म्हटलं की घरात जागोजागी लावलेले दिवे, रांगोळी, रोषणाई, फराळाचे पदार्थ आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. पण, फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास फक्त लहान मुलांना आणि वयोवृद्धांनाच होत नाही, तर घरातल्या पाळीव प्राण्यांना आणि आजूबाजूच्या इतर प्राण्यांनाही होतो. विशेषतः कुत्रे आणि मांजरं फटाक्यांच्या आवाजाने घाबरतात. काही प्राणी भीतीने घरातल्या कोपऱ्यात लपून बसतात, तर काही अस्वस्थ होऊन इकडे-तिकडे पळू लागतात.