

How to Make Fragrant Herbal Dhoopbatti at Home Using Tulsi Manjari
esakal
DIY Herbal Dhoopbatti : संस्कृतीत तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप आढळते, ज्याची दररोज नियमित पूजा केली जाते. काळानुसार या रोपावर छोट्या मंजिरी (बिया) येतात. अनेकदा मंजिरी वाळल्यानंतर किंवा रोपाची छाटणी करताना त्या फेकून दिल्या जातात, तर काही घरांमध्ये त्यांचा पूजेत वापर केला जातो.
पण, तुम्हाला माहित आहे का की या वाळलेल्या तुळशीच्या मंजिरीपासून तुम्ही घरातच अत्यंत सुगंधित आणि केमिकलमुक्त धूपबत्ती बनवू शकता? तुळशीच्या मंजिरीमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म आणि प्रसन्न करणारा सुगंध असतो. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या मंजिरीपासून घरीच सोप्या पद्धतीने धूपबत्ती कशी तयार करावी.