esakal | चेहऱ्याला द्या तजेला! घरीच तयार करा किवीचा हेल्दी फेस मास्क
sakal

बोलून बातमी शोधा

चेहऱ्याला द्या तजेला! घरीच तयार करा किवीचा हेल्दी फेस मास्क

चेहऱ्याला द्या तजेला! घरीच तयार करा किवीचा हेल्दी फेस मास्क

sakal_logo
By
शर्वरी जोशी

शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. जर आपल्या आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्य यांचा पुरेपूर समावेश असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व त्वचेवर लगेच दिसून येतो. शरीरासोबतच त्वचेलादेखील पोषकघटक मिळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या आहारात भरपूर फळे व पाण्याचा समावेश केला पाहिजे. यामध्येच किवी (kiwi) हे फळ त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असल्याचं समोर आलं आहे. या फळामुळे शरीराला थंडावा मिळतो. सोबतच त्वचेचा पोतदेखील सुधारतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम, डाग कमी होतात. म्हणूनच, किवी खाण्यासोबत त्याचा फेसपॅक किंवा फेसमास्क (face mask) त्वचेसाठी कसा उपयुक्त आहे ते जाणून घेऊयात. इतकंच नाही तर हा फेस मास्क घरी कसा तयार करायचा तेही पाहुयात. (how-to-make-kiwi-face-mask-at-home-for-a-radiant-face)

किवीमध्ये सी जीवनसत्व असल्यामुळे त्वचेवरील मृतपेशी दूर होण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. म्हणूनच किवीचा फेसमास्क वापरणं अत्यंत फायद्याचं आहे.

हेही वाचा: पाळीव श्वानाला कुत्रा म्हटल्यामुळे दोन जणात तुंबळ हाणामारी

१. दही व किवीचा फेस मास्क -

किवीची पेस्ट तयार करुन त्यात थोडं दही मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट एकत्र करुन चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

२. किवी आणि बदाम पेस मास्क -

आदल्या रात्री काही बदाम भिजत घाला व सकाळी किवीसोबत हे बदाम बारीक वाटून घ्या. तयार झालेल्या या पेस्टमध्ये गव्हाचं पीठ घालून ते चेहऱ्याला लावा. ही पेस्ट वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा.

३. प्लेन किवी फेस मास्क -

अनेक जणांना किवीच्या मास्कमध्ये अन्य कोणताही पदार्थ मिक्स करुन तो लावायला फारसं आवडत नाही. त्यामुळे अशा वेळी किवीची साल काढून त्याची पेस्ट तयार करा व ही पेस्ट चेहरा व मानेला लावा. २० मिनिटानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.