Rose Petals Face Scrub : गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा स्क्रब, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

Rose Petals Face Scrub : मार्केटमधील स्क्रब्सचा वापर करण्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या स्क्रब्सचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा ही वापर करू शकता.
Rose Petals Face Scrub
Rose Petals Face Scrubesakal

Rose Petals Face Scrub : त्वचा सुंदर आणि फ्रेश दिसावी, असे प्रत्येकीला वाटते. त्वचेची योग्य काळजी घेतली तर त्वचेच्या समस्या होण्याचे प्रमाण कमी होते. आजकाल महिला स्किनकेअरच्या बाबतीत चांगल्याच जागरूक झाल्या आहेत. मात्र, स्किनकेअर रूटीनमध्ये तुमच्या त्वचेला सूट होणारे आणि त्वचेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रॉडक्ट्सचा समावेश करणे गरजेचे आहे.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण फेसवॉशचा वापर करतो. विविध प्रकारच्या स्क्रब्सचा वापर करतो. मात्र, मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, मार्केटमधील स्क्रब्सचा वापर करण्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या  स्क्रब्सचा वापर करणे गरजेचे आहे.

यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा ही वापर करू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांपासून फेस स्क्रब बनवले जाते. हे स्क्रब कसे बनवायचे? चला तर मग जाणून घेऊयात.

Rose Petals Face Scrub
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

गुलाबाचे फेस स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • कोकोनट मिल्क अर्धा कप

  • गुलाबाच्या पाकळ्यांची बारीक पेस्ट

  • मुलतानी माती २ चमचे

  • ओटमील १ चमचा

  • बदाम पावडर १ चमचा

गुलाबाचे फेस स्क्रब कसे बनवायचे?

  • सर्वात आधी गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करून याची पेस्ट तयार करा.

  • आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

  • या गुलाबाच्या पेस्टमध्ये मुलतानी माती मिसळा.

  • त्यानंतर, यामध्ये बदाम पावडर, ओटमील आणि कोकोनट मिल्क मिसळा.

  • हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र केल्यानंतर चेहऱ्यावर लावा.

  • आता १०-१५ मिनिटे चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर, १५ मिनिटे चेहरा तसाच ठेवून त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

  • या फेस स्क्रबमुळे चेहऱ्यावर छान ग्लो येईल आणि चेहरा फ्रेश दिसेल.

  • अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा या फेसस्क्रबचा चेहऱ्यावर वापर करा.

गुलाबाचे फेस स्क्रब चेहऱ्यावर लावण्याचे फायदे कोणते?

  • गुलाबाचे फेस स्क्रब चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

  • यासोबतच त्वचेवरील काळे डाग निघून जातात.

  • तुमची त्वचा फ्रेश आणि तजेलदार दिसू लागते.

  • या स्क्रबचा वापर चेहऱ्यावर करताना हलक्या हाताने करा, जेणेकरून तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होईल.

Rose Petals Face Scrub
Skin Care Tips : चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? मग, बनवा ‘हे’ ड्रायफ्रूट फेसपॅक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com