
लग्नातील प्रत्येक गोष्ट, आठवणी या स्त्रियांसाठी खास असतात. त्यामुळे लग्नातील साडी, बांगड्यांचा चुडा, शेला अगदी फोटोसुद्धा स्त्रिया अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवत असतात. या प्रत्येक गोष्टीसोबत त्यांच्या काही आठवणी जोडलेल्या असतात. यामध्येच काचेचा चुडा अत्यंत नाजूक असल्यामुळे तो व्यवस्थित हाताळावा लागतो. मात्र, अनेकदा घर आवरताना किंवा शिफ्ट करताना या बांगड्यांना धक्का लागला तर त्या तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच, लग्नातील चुडा कशा पद्धतीने जपून ठेवायचा ते पाहुयात. (how to take care of glass bangles)
१. टिश्शू गुंडाळून -
साधारणपणे प्रत्येक स्त्री काचेच्या बांगड्या न्यूज पेपरमध्ये गुंडाळून ठेवत असते. मात्र, पेपरमध्ये गुंडाळण्यापूर्वी या बांगड्या टिश्शू पेपरने नीट कव्हर करणं गरजेचं आहे. टिश्शू पेपर किंचितसा सॉफ्ट असल्यामुळे चुड्यावरील शाइन कमी होत नाही. तसंच त्या लवकर टिचतदेखील नाहीत. त्यामुळे प्रथम चुडा टिश्शू पेपरमध्ये गुंडाळावा आणि त्यावर न्यूज पेपर लावावा.
२. एअर टाइट डब्बा -
आतापर्यंत गृहिणींनी एअर टाइट डब्बा केवळ खाद्यपदार्थ ठेवण्यासाठीच वापरला असेल. परंतु, या डब्ब्याचा वापर केल्यामुळे चुडादेखील व्यवस्थित राहतो. विशेष म्हणजे वर्षानुवर्ष त्याच्यावरची चमक जराही कमी होत नाही. जर तुमचा चुडा डिझायनर किंवा वर्क केलेला असेल तर तो एअर टाइट डब्ब्यातच ठेवा. कारण, अनेकदा डिझायनर चुडा हवेच्या संपर्कात आल्यावर तो काळा पडण्याची शक्यता असते.
३. बटर पेपर -
जर तुमच्याकडे एअर टाइट डब्बा नसेल तर काचेच्या बांगड्या किंवा चुडा बटर पेपरमध्ये गुंडाळून देखील ठेवता येऊ शकतो. बटर पेपरमध्ये जुडा गुंडाळून तो प्लास्टिकच्या डब्यात ठेवावा.
४. सुती कापड -
चुड्यावर जर स्टोन वर्क असेल तर सुती कापडामध्ये तो गुंडाळून ठेवावा. त्यानंतर ही एका झीप बॅगमध्ये जुडा ठेऊन द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.