esakal | पोस्ट कोविड लक्षणे असल्यास बाळाला स्तनपान करावे का?
sakal

बोलून बातमी शोधा

Baby with Mother

पोस्ट कोविड लक्षणे असल्यास बाळाला स्तनपान करावे का?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

दीड वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा covid-19 प्रादुर्भाव आता कमी होत आहे. मात्र, कोविडवर मात केलेले अनेक जण पोस्ट कोविड समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्येच अनेक राज्यांमध्ये डबल म्युटंट स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळे या काळात प्रत्येकाने स्वत: ची व कुटुंबीयांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्याच्या काळात लहान मुलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, कोविड काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे डॉक्टारांनी सांगितलं आहे. तसंच कोविडची लक्षण असलेल्या मातांना बाळाला स्तनपान करावे की करु नये याविषयीदेखील मार्गदर्शन केलं आहे. (how-to-take-care-of-newborn-baby-breastfeeding-during-covid-19)

बालरोग आणि शिशूविकार तज्ज्ञ डॉक्टर शरद थोरा यांनी एका मुलाखतीत कोविड काळात नवजात अर्भकांची काळजी कशी घ्यावी हे सांगितलं आहे. त्यांच्यानुसार, ९ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला तर त्याला कोरोना होण्याची शक्यता फार कमी असते.

हेही वाचा: कोरोना काळात लहान मुले झाली लठ्ठ; वाढलेले वजन 'असे' करा कमी

कोरोना काळात बाळाची घ्या 'ही' काळजी

१. बाळाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी स्त्रियांनी डबल मास्क वापरावा.

२. बाळाला स्तनपान करतान शक्य होईल तितकं शारीरिक अंतर ठेवावं. कारण, आईच्या श्वासोच्छवासाद्वारे बाळाला इंफेक्शन होऊ शकतं.

३. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

४. बाळाला मांडीवर ठेवण्यापूर्वी स्वच्छ कपडे वापरा.

५. स्तनपान झाल्यानंतर बाळाला बिलगुन झोपण्यापेक्षा त्याला पाळण्यात ठेवा. सतत बाळाला स्पर्श करु नका.

६. लहान बाळाला आवश्यक असणाऱ्या सर्व लशी डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या.

डिलिव्हरी झाल्यानंतर वॅक्सीनचे साईड इफेक्ट्स दिसले तर बाळाला स्तनपान करावं का?

अनेकदा स्त्रियांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्यात वॅक्सीनचे साईड इफेक्ट्स दिसून येतात. यात बऱ्याच स्त्रियांना ताप येतो. त्यामुळे ताप आल्यानंतर बाळाला स्तनपान करावे की करु नये हा प्रश्न अनेक मातांना पडतो. जर, स्त्रियांमध्ये केवळ ताप असेल तर अशा स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याने पेरासिटामोलची गोळी घेऊ शकतात. यामुळे बाळाला त्रास होत नाही. मात्र, जर लक्षण गंभीर असतील तर त्वरीत डॉक्टांशी संपर्क साधावा.

loading image