Beauty Tips| सेलिब्रिटीसारख्या उजळ चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे हायड्रेटिंग फेशिअल ; जाणून घ्या स्टेप्स आणि फायदे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Beauty Tips: सेलिब्रिटीसारख्या उजळ चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे हायड्रेटिंग फेशिअल

पुणे : पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करणे ही काळाची गरज बनली आहे. सुंदर दिसण्यासाठी फेशिअल,क्लिनअप सारख्या ट्रिटमेंट करून घेतल्या जातात. यामध्येही आता अडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे. सध्या हायड्रेटिंग फेशिअलचा जमाना आहे. हे फेशिअल केल्यावर चेहऱ्यावर सेलिब्रिटीसारखा ग्लो येतो.

आज आपण याच फेशिअलबद्दल जाणून घेणार आहोत. या फेशिअलचे फायदे जाणून घेतल्यानंतर हायड्रेटिंग फेशिअल एकदा तरी करुन पाहावे अशी इच्छा नक्की होईल. चला तर जाणून घेऊया हायड्रेटिंग फेशिअल म्हणजे नेमके काय ?

हायड्रफेशियल कसे काम करते

हायड्रेटिंग फेशिअल ही फेशियलची प्रक्रिया असून यामध्ये चेहऱ्याची डेड स्किन स्वच्छ केली जाते. या प्रक्रियेला एक्सफोलिएशन म्हणतात. यानंतर ग्लायकोलिक आणि सॅलिसिलिक ऍसिड सोलण्याची प्रक्रिया होते. व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शनद्वारे चेहरा स्वच्छ करून त्वचेचे फेशियल केले जाते. त्यानंतरच्या टप्प्यात, अँटिऑक्सिडंट्स सीरमच्या मसाजद्वारे त्वचेमध्ये वितरित केले जातात.

हायड्रफेशियलचे स्टेप्स

पहील्या टप्प्यात त्वचा एक्सफोलिएट केली जाते. म्हणजेच त्वचेतील मृत त्वचा पूर्णपणे काढून टाकली जाते. एक्सफोलिएशन नंतर, त्वचा चमकू लागते आणि अडकलेली छिद्रे उघडतात. सॅलिसिलिक अॅसिड पील फेस पॅक त्वचेवर लावला जातो. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग निघून जातात.

यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी होत नाही. शेवटी, सीरमच्या रूपात, त्वचेच्या आत अँटी-ऑक्सिडंट्ससह विविध प्रकारचे ऍसिड वितरित केले जातात, ज्यामुळे चेहरा चमकतो आणि त्वचेला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. २५ पेक्षा जास्त वय असलेल्या चेहऱ्यावर हे फेशीयल अधिक खुलून दिसते.

हायड्राफेशियलचे फायदे

हायड्राफेशियल त्वचेच्या आतील भागात ओलावा आणते. हायड्राफेशियलमुळे त्वचा बाहेरून चमकवते आणि मृत त्वचा पूर्णपणे काढून टाकते. वय अधिक वाढल्याची लक्षणे कमी करण्यासाठी देखील हायड्राफेशियल फायदेशीर आहे.

Web Title: Hydrafacial Will Enhance Your Skin Like A Celebrity Know Its

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Face BeautyBeauty Tips