Success Story: आई करायची 'मिड-डे मील'चे काम, मुलाने अडचणींवर मात करत IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

IAS Dongre Revaiah Success Story एका तरूणाच्या जिद्दीची कहाणी आपण जाणून घेणार आहेत. या तरूणाने IAS अधिकारी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कित्येक अडचणींचा हसतमुखाने सामना केला.
Dongre Revaiah IAS Success Story
Dongre Revaiah IAS Success StorySakal

एखाद्याने आयुष्यात स्वतःचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे ठरवले की मग या व्यक्ती स्वप्नांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर मात करतातच. अशाच एका तरूणाच्या जिद्दीची कहाणी आपण जाणून घेणार आहेत. या तरूणाने IAS होण्यासाठी कित्येक अडचणींचा हसतमुखाने सामना केला. 

डोंगरे रेवैया (Dongre Revaiah) असे त्यांचे नाव आहे. डोंगरेनं (Success Story of IAS Dongre Revaiah) UPSC CSE 2022 परीक्षेत 961 गुण मिळवून 410 वा क्रमांक पटकावला. लहानपणापासूनच त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते, पण इथंपर्यंत पोहोचणे मुळीच सोपे नव्हते.

Dongre Revaiah IAS Success Story
UPSC Success Story : आईच्या स्वप्नाला यशाचा मुलामा! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. कल्पेशचे यूपीएसीत यश

डोंगरे 4 वर्षांचा असताना वडिलांचं झालं निधन 

डोंगरे रेवैया केवळ चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असे कुटुंब होते. उदरनिर्वाह करण्यासाठी रेवैयांच्या आईने केवळ दीड हजार रूपये मासिक पगारावर माध्यान्ह भोजन तयार करण्याचे कार्य हाती घेतले. या कमाईतून त्यांनी आपल्या तीन मुलांचा शैक्षणिक खर्च भागावला.

डोंगरे रेवैय्यानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाहिला संघर्ष 

डोंगरे रेवैया हे (Dongre Revaiah) तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद येथील तुंगडा गावचे रहिवासी आहेत. डोंगरे यांनी बालपणापासून ते IAS होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत कित्येक अडचणींचा सामना केला. पण कौतुकाची बाब म्हणजे ते लहानपणापासूनच अभ्यासात फार हुशार होते. 

Dongre Revaiah IAS Success Story
Success Story : पोराने नाव काढलं, सफाई कामगार ते रेल्वेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

केवळ आर्थिक संकटांमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करताना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागले. इयत्ता दहावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी गावातील सरकारी शाळेतून पूर्ण केलं. पण त्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे होते. अशा परिस्थितीत डोंगरे यांनी AIEEE  परीक्षा दिली आणि चांगल्या रँकसह त्यांना IIT Madras मध्ये शिकण्याची संधी चालून आली. पण येथे प्रवेश घेण्याकरिता त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नव्हते.  

अन् अशी मिळाली मदत

दरम्यान, तुंगडा गावातील तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अशोक कुमार तुंगडा गावामध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळेस जमावातील एक तरूण दोन कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर झाला. 

Dongre Revaiah IAS Success Story
Success Story : पोराने नाव काढलं, सफाई कामगार ते रेल्वेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

त्या तरूणाच्या एका हातात विद्यापीठाचे पत्र आणि दुसऱ्या हातात IIT Madrasचे ऑफर लेटर होते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून डोंगरे रेवैयाच होते. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मदत मिळावी याकरिता ते पुढे आले होते. कारण डोंगरे रेवैया यांना IIT Madras मधील इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी तब्बल २० हजार रूपयांची गरज होती.  

यादरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी डोंगरे रेवैय्या यांनी सादर केलेली कागदपत्रे पाहिली असता, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रेवैया यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. 

शेवटी क्राउडफंडिंग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने डोंगरे रेवैय्यांना आयआयटी मद्रासमध्ये प्रवेशासाठी आर्थिक मदत मिळाली. येथूनच त्यांना आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणाही मिळाली.

नोकरीसह परीक्षेची केली तयारी

वर्ष 2017 मध्ये IIT मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगचा इंटीग्रेटेड कोर्स पूर्ण केल्यानंतर, त्यांनी 70व्या क्रमांकासह GATE परीक्षा देखील क्लीअर केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना  मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये नोकरी मिळाली. 

दुसरीकडे आयएएस अधिकारी होण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होतीच. त्यांना आईला जगातील सर्व सुख मिळवून द्यायचे होते, कारण त्यांनी आईने आयुष्यभर केलेला संघर्ष पाहिला होता.  

अखेर स्वप्न झाले पूर्ण

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) मध्ये सरकारी नोकरी मिळूनही त्यांची आयएएस अधिकारी होण्याची इच्छा कमी झाली नाही. अखेर 2020 मध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 

वर्ष 2021 मध्ये त्यांनी पहिला प्रयत्न केला, मात्र यात केवळ दोन गुणांनी त्यांची संधी हुकली. पण आता पूर्णतः UPSC परीक्षेवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्यांनी चक्क नोकरीच सोडली. वर्ष 2022मध्ये परीक्षेत 410 वा क्रमांक पटकावून अखेर त्यांनी आपले आणि आईचे स्वप्न केलेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com