
What can a common man do if India and Pakistan go to war: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढतांना दिसत आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्यांवर हल्ला करण्यात आला.
भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारतातील काही भागात (८-९ मे २०२५) रोजी जोरदार गोळीबार आणि ड्रोन हल्ले झाले आहेत, या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरमध्ये 12 हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या या तणावावर देशातील सामान्य नागरिकही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर सामान्य नागरिक युद्धात लढू शकतो का किंवा कसं योगदान देऊ शकतो हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.