Relation Tips: जोडीदार वयाने मोठा आहे का? नातं दृढ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

your partner is older than you
Relation Tips: जोडीदार वयाने मोठा आहे का? नातं दृढ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

जोडीदार वयाने मोठा आहे का? नातं दृढ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

प्रेमात (love) आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असं म्हणतात. प्रेम कुणावरही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जीवनसाथी (Life Partner) शोधत असता, तेव्हा त्याचं वय किती आहे किंवा तो कसा दिसतो, याकडे तुम्ही लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने (elder than you) मोठ्या असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला डेट करू शकता किंवा असे बरेच लोक असतील ज्यांचे पार्टनर वयाने त्यांच्यापेक्षा मोठे असतील. अशा परिस्थितीत तुमचं नाते अधिक घट्ट करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (if your partner is older than you, then follow these Tips)

हेही वाचा: Relation Tips: जोडीदाराच्या या सवयी मुलींना अजिबात आवडत नाहीत

1. अपेक्षांबद्दल चर्चा करा (Discuss expectations)-

प्रत्येकाची काहीना काही स्वप्न असतात. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अपेक्षांबद्दल बोलले पाहिजे. बर्‍याच वेळा असे घडते की तुमच्यापैकी एकाला लग्न करायचे असते तर दुसऱ्याला वाट पाहायची असते, त्यामुळे सुरुवातीला या गोष्टींबद्दल चर्चा करा.

2. फरक स्वीकारा (Accept the difference)

बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की, दीर्घ आणि निरोगी बाँडिंगसाठी एकमेकांमधील सुसंवाद आणि परस्पर संबंध आवश्यक आहेत. तुमचा जोडीदार तुमचा मित्र असेल किंवा तुमच्या ओळखीचा असेल तरीही तुम्ही त्याचा स्वभाव आणि वय या दोन्हीतील फरक स्वीकारला पाहिजे. तुमच्या नात्यात जोडीदाराला थोडी मोकळीक द्या, जिथे तुमचा जोडीदार त्याच्या वेगवेगळ्या सवयी, आवडीनिवडी उघडपणे जगू शकेल.

हेही वाचा: Relationship Tips| ब्रेकअपनंतर नव्या नात्याची सुरुवात करताय? मग या चुका टाळा

3. जोडीदाराला साथ द्या (Accompany your partner)-

तुमच्या जोडीदाराला नोकरीत स्थिरता हवी असेल परंतु तुम्हाला जोखीम घ्यायची असेल, तर अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून दोन्ही गोष्टींची अपेक्षा करू नका. त्यापेक्षा जोडीदाराला सपोर्ट करा. तुम्ही या प्रकरणावर चर्चा करून तोडगा काढू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top