
Parenting Tips : मुलं तुमचं ऐकत नाहीत? या आहेत हट्टी मुलांना हाताळणाच्या सोप्या ट्रिक्स
Important Parenting Tips To Handle children's Tantrum : मुलांवर प्रेम करणं, त्यांचे लाड करणं यात काहीही गैर नाही. मुलं लहान असतात तेव्हा कुटुंबातला प्रत्येकच जण त्यांचे लाड करत असतो. पण त्यामुळे मुलांच्या काही सवयी आपणच आपल्या नकळत बिघडवत असतो. पालकांच्या या वागण्याचा सरळ परिणाम मुलांच्या स्वभावावर होतो आणि ही गोष्ट आपण इग्नोर करून चालणार नाही.
पालकांकडून गरजेपेक्षा जास्त मिळणारं प्रेम, होणारे लाड यामुळे मुलं हट्टी आणि चीडचीडे, रागीट होतात.
मुलांचा हट्ट एका मर्यादेपर्यंत ठिक असतो. पण त्या पलिकडे होणारा हट्टीपणावर पालकांनी सतर्क व्हायला हवे. कारण हा हट्टीपणा वयाबरोबर वाढत जातो आणि त्यामुळे अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ येते.
त्यामुळे अशा मुलांना वेळीच अडवण्यासाठी काही सोप्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया त्या गोष्टी.
वाद घालू नका
सहसा हट्टी मुलांची इच्छाशक्ती फार असते. त्यामुळे जर आपण त्यांचं म्हणणं ऐकत नसू तर ते वाद घालतात. आपणही त्यावर उत्तर देत गेलो तर ते जास्त वाद घालू लागतात. अशा वेळी शांततेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. यामुळे त्यांचा राग आणि हट्ट कमी होतो. पालकांनी जर मुलांशी वाद घातला तर ते तुमच्या प्रत्येकच गोष्टीला नाकारायला शिकतील.
मुलांना प्रतिक्रिया देऊ नका
जेव्हा मुलं चांगलं काम करतात तेव्हा त्यांचं कौतुक करायलाच हवं. पण जेव्हा मुलं हट्ट करतात तेव्हा त्यांना रागवून, ओरडून उपयोग नसतो. अशावेळी त्यांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. रागवण्यापेक्षा तुमचं शांत राहणंच त्यांच्यासाठी मोठी शिक्षा असते. मुल शांत झालं की, त्याला समजावून सांगा.
मुलाला पर्याय द्या
जेव्हा मुलांना कोणतंही काम करायला सांगतो तेव्हा ते खूप प्रश्न विचारतात. अशात जर मुलांना एका पेक्षा जास्त पर्याय द्यावे. कारण जे त्यांना नाही म्हटलं तेच काम मुलांना करायला आवडतं.
मुलांसाठी काही नियम बनवा
आयुष्याला वळण लागण्यासाठी प्रत्येकासाठी काही नियम असणं आवश्यक आहे. जर नियमांचं पालन नाही केलं तर काय काय नुकसान होऊ शकतं, नियम तोडले तर काय होऊ शकतं आणि नियम पाळले तर काय फायदे होतात हे त्यांना समजवून सांगा. असं केल्याने मुलांच्या आयुष्याला आणि वागण्याला एक शिस्त लागेल.
पण हे नियम आणि शिस्त फार कठोर नसावे, त्यांचा अतिरेक नसावा हे लक्षात ठेवायला हवं.