

Indian Army Day 2026 | History, Significance Explained
sakal
Indian Army Day importance explained: दिवस- रात्र आपल्या जीवाची पर्वा न करता, सण-वार सगळेच दिवस सारखे मानत आपलं कर्तव्य बजावते ती भारतीय सेना. या सेनेत काम करत असलेल्या शूरवीरांना अभिवादन करत दरवर्षी 15 जानेवारी रोजी संपूर्ण देशात भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो.
हा दिवस केवळ एक औपचारिक सोहळा नसून, देशाच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या शूर जवानांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला सलाम करण्याचा दिवस आहे. भारतीय नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठीही या दिवसाला विशेष महत्त्व आहे.