esakal | मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..
sakal

बोलून बातमी शोधा

मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..

दुसऱ्या महायुद्धामुळे सगळीकडे महागाई प्रचंड वाढली. अनुषंगाने कापड प्रचंड महाग झालं. कापड महाग  झाल्याने सरकारकडून कमीत कमी कापड वापरण्याचा फतवा निघाला

मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खरंतर इ.स.पूर्व ५६०० मध्येच बिकिनी शैलीतील महिलांच्या कपड्यांचे पुरावे सापडले आहेत. रोमन कालखंडात काही महिलांनी बिकिनी सारखे कपडे परिधान केल्याची काही उदाहरणं इतिहासात पाहायला मिळतात. त्यावेळेस होणाऱ्या काही खास एथलेटिक इव्हेंटमध्ये महिलांनी असे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळतं. मात्र 'बिकिनी' फॅशन ही सर्वार्थाने नावारुपाला आली किंवा उदयास आली ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. 

त्याचं झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. अमेरिका विचारांनी आता जेवढा पुढारलेला देश आहे, साहजिकच तेंव्हा तेवढा पुढारलेला नव्हता. अशातही अमेरिकेत त्यावेळी महिलांना सनबाथ घेण्याची परवानगी होती. पण त्यासाठी अट मात्र एकच, ती म्हणजे महिलांनी गळ्यापासून ते गुडघ्यापर्यंत खाली डाऊन एक गाऊन परिधान करायचा आणि मगच सनबाथ घ्यायचा. 

मोठी बातमीआता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...

अमेरिकेत या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे वारे होते. पाहता पाहता दुसरं महायुद्ध सुरु झालं. दुसऱ्या महायुद्धामुळे सगळीकडे महागाई प्रचंड वाढली. अनुषंगाने कापड प्रचंड महाग झालं. कापड महाग  झाल्याने सरकारकडून कमीत कमी कापड वापरण्याचा फतवा निघाला. दरम्यान समाजात सनबाथची फॅशन होतीच. महिलांचा सनबाथ गाऊन जास्त कापड खातो,  म्हणून महिलांकडून सनबाथसाठी वापरण्यात येणाऱ्या गाऊनच्या उत्पादनावर सरकारने बंदी आणली. बंदी आणताना सरकारकडून सांगण्यात आलं की, "सनबाथसाठी वापरला जाणारा गाऊन हा कमीत कमी कपड्यात बनवा"  आणि अशातच जन्म झाला बिकिनीचा.   

याच पार्श्वभूमीवर रुई लेअर्द व्यक्तीने 'टू पीस' स्विम सूट म्हणजेच बिकनीचा शोध लावला. अमेरिकेने त्यावेळी बिकनी अटोल या जागेवर न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली होती. अमेरिकेने केलेली ही एक क्रांतिकारी चाचणी होती.  याच धर्तीवर रुई यालादेखील त्याने लावलेला नव्या सनबाथच्या 'टू पीस'  स्वीमसूटचा शोध हा प्रचंड क्रांतिकारी असल्याचं वाटत होतं आणि म्हणूनच ज्या ठिकाणी  न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेली त्या जागेच्या नावावर रुई याने आपल्या आविष्काराचं नाव ठेवलं 'बिकिनी' आणि अशी जन्माला आली 'बिकिनी'.   

मोठी बातमीकोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...
 

बिकिनीचा शोध लावल्यानंतर ती सर्वांपर्यंत पोहचविणं  मोठं चॅलेंज रुई समोर होतं. त्याने अनेकांना याबद्दल जाहिरात करण्यास विचारणा केली. मात्र बिकिनीची साईझ पाहून कुणीही त्याची जाहिरात करण्यास धजावत नव्हतं. अशात रुई याच्या मदतीला आली ती म्हणजे मिशेलाईन. मिशेलाईन ही त्याकाळची न्यूड आर्टिस्ट होती, मिशेलाईनने बिकिनी घालून जाहिरात केली आणि ती प्रचंड हिट देखील झाली. 

दरम्यानच्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली. 

inside story know history and invention of bikini read interesting facts

loading image