Child Safety Tips: उन्हाळ्यात कूलर ठरतो फायद्याचा, मात्र लहान मुलांना त्यापासून कसं ठेवाल सुरक्षित? जाणून घ्या

Child Safety Tips: तापमान वाढल्याने कूलरचा वापरही सुरू झाला आहे. मात्र, कूलर वापरताना विजेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा जिवावर बेतण्याचा प्रसंग ओढावू शकतो.
Child Safety Tips:
Child Safety Tips: Sakal

Child Safety Tips: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांत उन्हाचा पारा वाढत आहे. तापमान वाढल्याने कूलरचा वापरही सुरू झाला आहे. मात्र, कूलर वापरताना विजेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा जिवावर बेतण्याचा प्रसंग ओढावू शकतो. त्यामुळे कूलर वापरताना वीजग्राहकांनी पुरेशी दक्षता घेत उपाययोजना करण्याची गरज आहे.

उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी घर, दुकान, कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कूलरचा वापर सुरू होतो. घरात अडगळीला पडलेले कूलर बाहेर येतात. मात्र, अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याने कूलरची वायरिंग किंवा स्विचेस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळेच कूलर सुरू करण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे. काळजी न घेतल्यास दरवर्षी अपघात होण्याचे प्रकार घडतात.

कूलरचा वापर नेहमी थ्री पिन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण उपलब्ध असून विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. फायबर बाह्य भाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर करावा. घरातील लहान मुले कूलरच्या सान्निध्यात येणार नाहीत. याची खबरदारी घेऊनच कूलरची जागा निवडावी. कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीजपुरवठा येऊ नये, यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. त्यामुळे लोखंडी बाह्य भागात वीज प्रवाहित झाल्यास धक्का बसणार नाही.

Child Safety Tips:
Mandukasana Benefits: मधुमेही रूग्णांसाठी मंडूकासन लाभदायी, जाणून घ्या करण्याची पद्धत अन् फायदे
  • वीज तार पाण्यात बुडू देऊ नका, अर्थिंग तपासा

ओल्या जमिनीवर उभे राहून कूलर सुरू करू नका. पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीजपुरवठा आधी बंद करा. त्यानंतरच थ्री पिन प्लग काढल्यानंतर पंपाला हात लावावा. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीजप्रवाह बंद करून प्लग काढावा.

तसेच कूलरमधील पाणी जमिनीवर सांडू देऊ नका. ओलसर हाताने किंवा पंप पाण्यात बुडाला नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच पंपाला वीजपुरवठा करणारी वायर पाण्यात पूर्णपणे बुडालेली नसावी. पंपाचे अर्थिंगही योग्य असल्याचे तपासून घ्यावे. पंपातून वीज प्रवाहित होणार नसल्याची खात्री करावी.

  • कोणती काळजी घ्यावी काळजी

कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीजप्रवाह बंद करून प्लग काढावा. नंतरच पाणी भरावे.

कूलरच्या आतील वीजतार पाण्यात बुडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

कूलरमधील पाणी जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी.

पंपाला वीजपुरवठा करणारी वायर पाण्यात बुडालेली नसावी.

पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे.

पंपातून वीज प्रवाहित होत नसल्याची खात्री करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com