International Coffee Day 2024: कॉफीच्या माध्यमातून या स्त्रीने घेतली उद्योगभरारी, नवऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतरही सोडली नाही जिद्द..

International Coffee Day 2024: कंपनीवर असलेले कर्ज आणि पतीच्या निधनाच्या दुखा:ला दोन हात करत मालविका यांनी हिमतीने परिस्थिती सांभाळी आहे.
International Coffee Day 2024:
International Coffee Day 2024:Sakal
Updated on

International Coffee Day 2024: दरवर्षी 1 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेकांना सकाळी कॉफी प्यायला आवडते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे हानिकारक पदार्थांमुळे होणा-या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. तसेच मूड फ्रेश ठेवण्यापासून ते तुमची त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत कॉफीचा दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे आपण वापर करतो.

अनेक लोक मित्रांसह, कुटुंबासह, प्रेयसीसोबत 'सीसीडी' (CCD) ला कॉफी प्यायला जातात. येथे अनेक लोक फक्त कॉफी प्यायला नाही तर गप्पागोष्टी करायला आणि बिझनेस मीटिंग्स घेण्यासाठी जातात. पण तुम्हाला माहीती आहे की एकदा सीसीडी बंद करण्याची वेळ आली होती. कारण त्यावर कर्ज वाढले होते. कंपनी सुरू करणाऱ्या व्हीजी सिद्धार्थने कर्जाच्या तणावाखीला आत्महत्या केली पण त्यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी हार न मानता कंपनीला पुन्हा जुनं वैभव मिळवून दिले.

ccd
ccdSakal

सीसीडीची सुरूवात कशी झाली?

सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये सीसीडीला सुरूवात केली. त्यापूर्वी 1992पर्यंत त्यांनी सहा ते सात एकरात पसरलेले कॉफी मळे विकत घेतले. शेअर बाजारात पैसे गुंतवून काही पैसे कमवले तर काही पैशांच्या स्वरूपात वडिलांनी मदत केली आणि सीसीडीला सुरूवात झाली. 11जुलै 1996 मध्ये बेंगळुरूला त्यांनी सीसीडी चे पहिले आउटलेट सुरू केले. तेव्हापासूनच तरूणांमध्ये कॉफीची क्रेझ वाढत गेली.

International Coffee Day 2024:
International Coffee Day 2024: तुमच्या दैनंदिन जीवनात कॉफीचा 'या' ५ प्रकारे करू शकता वापर
Cafe Coffee Day
Cafe Coffee DaySakal

मालविका यांची उद्योगभरारी

कर्जबाजारी झालेल्या कंपनीचे ओझे आणि पतीच्या आत्महत्येच्या दुखा:ला सामोरे जात मालविका हेगडे यांनी हिम्मत हारली नाही. मालविका या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएस कृष्णा यांची मुलगी आहे.

सीसीडीला एक यशस्वी कंपनी बनवण्याचे त्याच्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम घेतले. 31 जुलै 2019 पर्यंत कंपनीवर 7 हजार रुपये कर्ज होते. डिसेंबर 2020 मध्ये, मालविका सीसीडी इंटरप्राइजेस लिमिटेडची CEO बनली. कर्ज कमी करणे आणि कर्मचाऱ्यांचा कंपनीवरील विश्वास कायम ठेवणे हे त्यांचे पहिले ध्येय होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले. एका वर्षात त्यांनी 1,644 कोटी रुपयांचे कर्ज फेडले.

मालविका हेगडे यांनी ब्लॅकस्टोन आणि श्रीराम क्रेडिट कंपनीशी करार केला. खर्च कमी करण्याचे मार्ग शोधा आणि महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागले. कंपनी बंद करण्याची चर्चा संपुष्टात आली आणि व्यवसायाला गती मिळू लागली. आज जवळपास सुमारे 572 कॅफे कॉफी डे आउटलेट यशस्वीपणे सुरू आहेत. कंपनीचे कर्ज 7,000 कोटी रुपयांवरून केवळ 465 कोटी रुपयांवर आले आहे. मालविका यांनी पतीच्या निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ करत 'सीसीडी' कंपनी नव्याने उभारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.