International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

International Firefighters' Day 2024: भारतात हा दिवस 14 एप्रिल साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानणे हा आहे.
International Firefighters' Day 2024:
International Firefighters' Day 2024:Sakal

जगभरात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवशी कुठला ना कुठला दिवस साजरा केला जातो. त्यामागे त्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व आहे. दरवर्षी 4 मे हा दिवस फायर फायटर डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानणे हा आहे.

1999 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये लिंटनच्या झुडपात आग लागली होती, त्यानंतर एक टीम आग विझवण्यासाठी तिथे गेली होती. मात्र विरुद्ध दिशेकडून वारा वाहत असल्याने आगीत होरपळून टीममधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

त्याचवेळी वाऱ्याबाबत हवामान खात्याकडून कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. मात्र वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जाऊ लागला.

International Firefighters' Day 2024:
Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

युरोपमध्ये झाली सुरूवात

हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरिन, त्यांचे 4 मे रोजी निधन झाले. ते एक संत आणि अग्निशामक होते. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्या गावात एकदा आग लागली तेव्हा त्यांनी पाण्याच्या बादलीने आग विझवली. त्यानंतर हा दिवस दरवर्षी 4 मे रोजी युरोपमध्ये साजरा केला जाऊ लागला.

भारतात कधी साजरा केला जातो?

भारतात हा दिवस 14 एप्रिल साजरा केला जातो. 1944 मध्ये फोर्टस्टिकेन या मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीमुळे 66 सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतात फायर फायटर सर्व्हिस डे साजरा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com