- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला जगभर साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयं, खासगी संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात योग कार्यक्रम होतात, संकल्प घेतले जातात; पण योग हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा विषय नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा. कारण योग म्हणजे केवळ आसनं नव्हेत, तर शरीर, श्वास आणि मनाचं एकत्र संतुलन साधणारी एक जीवनशैली आहे.