Sabudana
Sabudana sakal

Sabudana Health Benefits : साबुदाणा खाणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

साबुदाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

साबुदाणा, ज्याला टॅपिओका पर्ल असेही म्हणतात. हा एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खाद्यपदार्थ आहे. विशेषत: भारतीयांमध्ये, उपवासाच्या वेळी हा एक उत्तम खाद्यपदार्थ मानला जातो. पण खरंच यात काही पोषक तत्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की नाही हे आज पण सविस्तर जाणून घेऊ.

साबुदाणाबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर साबुदाण्याच्या फायद्यांविषयी बोलताना एक्सपर्ट क्रिश अशोक यांनी सांगितले की, त्यांना साबुदाणा खायला आवडतो. ते स्वादिष्ट देखील आहे. पण हे जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड स्टार्च आहे. ते सांगतात की जर तुम्ही उपवासाच्या वेळी ते खात असाल तर त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढेल.

त्याच वेळी, ते असेही म्हणतात की हा पारंपारिक साबुदाणा नाही जो सुरुवातीला 1940 ते 1950 च्या दशकात उपलब्ध होता. एकंदरीत साबुदाणा खाणे चविष्ट वाटत असले तरी ते आरोग्यदायी किंवा ट्रेडिशनलही नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

Sabudana
Weight Loss: या सवयी जिमपेक्षा जास्त फायदेशीर, वजन कमी करण्याचा सोपा उपाय!

त्याच वेळी, आणखी एक पोषणतज्ञ मुग्धा प्रधान यांनी देखील सांगितले की साबुदाणा हा हाईली रिफाइंड स्टार्चचा एक प्रकार आहे, जो कसावा किंवा साबुदाणा वनस्पतीच्या मुळांपासून मिळतो. ते इतके रिफाइन केले जाते की ते रक्तामध्ये फार लवकर शोषले जाते आणि ब्लड शुगर वेगाने वाढते. हे एक अतिशय उच्च ग्लायसेमिक अन्न आहे म्हणजेच त्याचा GI इंडेक्स खूप जास्त आहे.

उपवासात साबुदाणा खाणे योग्य आहे का?

उपवास सोडण्यासाठीही साबुदाणा हा योग्य पर्याय नाही. कारण उपवास करताना तुमची इन्सुलिन संवेदनशीलता जास्त असते आणि अशा वेळी जास्त ग्लायसेमिक पदार्थ तुमच्या ब्लड शुगरमध्ये लक्षणीय वाढ करतात. ब्लड शुगरमध्ये अशा तीव्र बदलामुळे मज्जासंस्थेवर दबाव येतो जो तुमच्यासाठी योग्य नाही. कमी ग्लायसेमिक अन्नाने उपवास सोडावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com