esakal | तुमचे Sleep Routine खराब झालंय? 'या' गोष्टी माहित असणे गरजेचे!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचे Sleep Routine खराब झालंय? 'या' गोष्टी माहित असणे गरजेचे!

तुमचे Sleep Routine खराब झालंय? 'या' गोष्टी माहित असणे गरजेचे!

sakal_logo
By
शरयू काकडे

प्रत्येकाला कमी कमी ७-८ तासाची झोप आवश्यक असते पण, आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये उशीरा झोपणे आणि उशीर उठण्याची लोकांना सवयच झाली आहे. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आरोग्याचे खूप नुकसान होते. तुमचेही स्लीप रुटीन खराब झालंय का? मग तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.

ब्रिटिश संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची झोपण्याच्या वेळा अनियमित असतात त्यांची झोप कधीच पूर्ण होत नाही. त्यांचा मृत्यू दर नियमितपणे पुरेशी झोप घेण्याऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. जे रुग्ण झोप न येण्याच्या आजाराने पीडित असतात त्यांच्यामध्ये हृदय विकार विकसित होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

झोप न झाल्यामुळे आणि थकव्यामुळे सहसा गंभीर दुर्घटना होत आहे. संशोधनाच्या दाव्यानुसार झोप पुर्ण न झाल्यामुळे गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते. अर्धवट झोपेत गाडी चालवणे तितकेच धोकादायक आहे जितके दारू पिऊन गाडी चालवणे धोकादायक आहे कारण तुमचा रिस्पॉन्स टाईम दोन्ही उपक्रमांमुळे तितकाच प्रभावित होतो.

विशेषत: २५ व्या वर्षी कमी वयातील व्यक्तीसोबत अशा घटना घडतात. जेव्हा लोकांना कमी झोप पुर्ण होत नाही तेव्हा कित्येक जुने आजार उद्भविण्याचा धोका असतो. झोप न येण्याच्या आजारामुळे ९० टक्के लोक जुन्या कोणत्यातरी आजाराशी पीडित आहे जे धोकादायक ठरू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे वाढणाऱ्या आजारामध्ये काही जुन्या आजारांचा समावेश आहे जसे की, मधुमेह, हृदय विकाराचा झटका, हृदयाची धडधड थांबणे,हृदयाची अनियमित धडधड, हाय बिपी इ.

झोपे कमी झाल्यामुळे नैराश्याची लक्षण वाढतात.२००५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार, काळजी किंवा नैराश्यग्रस्त पीडित लोकांना त्यांची झोपेची रुटीनची नोद ठेवण्यास सांगितले होते. समोर आलेल्या माहितनुसार, जास्तकरून लोक रात्री सहा तासांपेक्षा कमी झोपतात.

जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा या तुम्ही कोणतीही गोष्ट व्यवस्थित होत नाही. घडणाऱ्या घडामोडींना व्यवस्थित प्रतिसाद देऊ शकत नाही, योग्य किंवा स्मार्ट निर्णय घेताना अडचण येऊ शकतेय जे लोक पुरेशी झोप नाही घेत ते झोपेच्या गरजेबाबत सुध्दा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, नीट झोप न झालेल्या स्थितीच्या वाईट परिणामांमुळे पीडित आहात तर स्नोबॉलिंगची समस्या उद्धभवू शकते.

एक रात्र जरी झोप झाली नाही तर डोळ्यांखाली सूज येते और त्वचा कोरडी त्वचा झाली. कोणतीही व्यक्ती चूकीचे रुटीन कायम ठेवत असेल तर त्यांची झोप कमी होते. डोळ्यांखाली काळे होणे, त्वचा कोरणे होणे, चेहऱ्यावर पूरळ येणे असे लक्षण दिसू शकतात.

sleep at work

sleep at work

पुरेशी झोप घेतली नाही तर झोप पूर्ण न झाल्यामुळे काळानुसार त्वचेतील इलॅस्टिसिटी कमी होते. थकवा देखील जाणवतो ज्यामुळे शरिरामध्ये अधिक हार्मोन कोलेस्ट्रोलचे उत्पादन होते. त्वचेमध्ये लवचिक आणि गुळगुळीत ठेवणाऱ्या प्रोटीनची कमी निर्माण होते.

नियमित झोपेमुळे तुमचे शरीरातील नियमित भूक निर्माण करण्यास मदत करते. कारण, तुम्ही झोपण्याची वेळ कमी केल्यास भूख वाढविण्यास मदत करणारे हॉर्मोन घ्रेलिनची निर्मिती वाढते आणि तुमच्या शरिरातील भूक कमी करणआरे लेप्टिन उत्पादन कमी होते. आपली भूक वाढल्यामुळे तुम्ही अधिक अन्न खाता आणि त्यामुळे स्थुलपणा वाढतो.

संशोधनातून समोर आले की, जे लोक दिवसामध्ये ७ तासांपेक्षा कमी झोपतात त्यांच्यामध्ये ९ तास किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्यांच्या तुलनेत स्थुलपण ३० टक्के अधिक असतो.

loading image
go to top