Communication Skills: विकास संवादकौशल्याचा

communication skills improvement tips: संवादकौशल्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीला अथवा समूहाला आपले विचार, भावना, अनुभव; तसेच अपेक्षांचे आदान-प्रदान करीत असतो.
communication skills improvement tips
communication skills improvement tips sakal
Summary

संवादकौशल्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीला अथवा समूहाला आपले विचार, भावना, अनुभव; तसेच अपेक्षांचे आदान-प्रदान करीत असतो.

- डाॅ. जयश्री फडणवीस

आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठे ध्येय साध्य करण्यासाठी संवादकौशल्य हे प्रभावी माध्यम आहे. तसेच प्रत्येक नातेसंबंध- मग तो वैयक्तिक असो वा व्यावसायिक- त्या संबंधांना उत्तमपणे जोपासणे, विकसित करणे हे संवादकौशल्यानेच शक्य होते.

इंग्रजीत आपण संवादकौशल्याला Communication skills म्हणतो. हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय. Commune = Group of people आणि Communication = Interaction with one or more people.

थोडक्यात काय, तर संवादकौशल्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीला अथवा समूहाला आपले विचार, भावना, अनुभव; तसेच अपेक्षांचे आदान-प्रदान करीत असतो. सर्व जीवनकौशल्यांतील सर्वांत प्रभावी कौशल्य म्हणजे उत्तम संवाद. जसे की, जंगलचा राजा सिंह, भावनांचा राजा ‘राग’, तर कौशल्यांचा राजा म्हणजे ‘संवादकौशल्य.’ चला तर बघुया, की प्रभावी संवादाला सुरुवात कशी करायची!

व्यक्तिभेट (Meeting) : प्रत्यक्ष भेट अर्थपूर्ण होण्याकरिता फोन अथवा ईमेलद्वारे भेट निश्चित (appointment) करावी- जेणेकरून मिळालेला वेळ आपण चर्चेकरीता हक्काने वापरू शकू. पूर्वनियोजित वेळ न घेता, असेच जाऊन भेटलो, तर भेटणाऱ्या व्यक्तीचे लक्ष इतर व्यवधानांकडे जाऊ शकते. भेटीपूर्वी संबंधित व्यक्तीची माहिती काढा, सोशल मीडियाचा वापर करा. त्यामुळे प्रथम भेटीत नेमके काय बोलावे हा प्रश्न पडणार नाही.

व्यक्तिमत्त्वाची छाप : First impression is your last impression, हे अनेकदा घडत असते. त्यामुळे ते महत्त्वाचे! पहिली भेट ही पुढील भेटींच्या श्रुंखलेकरता, भेटणाऱ्या व्यक्तीच्या कायम लक्षात राहिली पाहिजे. भेटताक्षणी आपली एक प्रतिमा समोरच्याच्या मनात तयार होत असते. ‘ही व्यक्ती कशी असेल’ ते ही व्यक्ती आपल्या पूर्वअनुभवावरून ठरवते.

आपली एक प्रतिमा स्वतःच्या मनात तयार करते. आपल्याला जाणून घेते. भेटणाऱ्या व्यक्तीचा लक्ष कालावधी (Attention span) महत्त्वाचा ठरतो. पूर्वी हा अवधी सात-आठ मिनिटांचा असे; पण आता इंटरनेट; तसेच सोशल मीडियाच्या परिणामांमुळे तो १० ते १५ सेकंदांवर आलाय. इथे तुमचे ‘power dressing’ मदतीचे ठरेल. कुठे आणि कशासाठी भेटणार आहात, त्यानुसार वेशभूषा करावी.

communication skills improvement tips
Personality Test : खाण्यापासून ते बूटांपर्यंतची आवड सांगते स्वभाव

भावना : आपल्या मनातील विचार कायमच आपल्या देहबोलीतून परावर्तित होतात. आपण आनंदी असू, तर देहबोलीही सकारात्मक असते. पाठीचा कणा सरळ, ताठ मान; पण वाचा नम्र यामुळे आश्वासक हसू चेहऱ्यावर पसरते. उदास मनस्थितीत असाल, तर भेटीपूर्वी दीर्घ खोल श्वास घ्या, विधायक विचार मनात आणा, ही भेट नक्कीच छान होणार.

दृष्टीभेट : स्वच्छ, निर्मल मनाने दृष्टीभेट घ्या. उगाचच घाबरणे, इकडे तिकडे बघत बोलणे, कोणी पाहतेय का, असले पोरकट वर्तन टाळले पाहिजे. जबाबदारीने भेटा.

अभिवाद‌न : भेटीसाठी उत्तम गृहपाठ केला असेल, तर प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक व परिणामकारक करता येते. उदा. या व्यक्तीला शेकहॅंड करावा का भारतीय पद्धतीचा नमस्कार!

आपुलकी : वरील सर्व पायऱ्या पार केल्यावर योग्य संवादातून आपुलकीचे संबंध प्रस्थापित करता येतील. त्यामुळे भविष्यातील भेटीगाठी विधायक व अपेक्षित परिणाम देणाऱ्या ठरतील. संवादाचा प्रवास पुढे नेण्याकरिता भेटलेल्या व्यक्तीचे एखाद्या गोष्टीकरीता कौतुक करा; पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की कौतुक प्रामाणिक असावे.

खोटे समोरच्याला लगेच लक्षात येते. व्यक्तीत कौतुकास्पद काही सापडले नाही, तर इतर गोष्टींचे कौतुक करा. जसे की, ‘‘अरे वा! भेटीची जागा मस्तच निवडलीत.’’ प्रत्येकाला कौतुक आवडतेच. त्यातून निर्माण झालेल्या डोपामाइन संप्रेरकामुळे पुढील संवाद आनंददायी होतो.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असताना उत्तम श्रोता बनणे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला सन्मान मिळाल्याची विधायक भावना तयार होऊ लागते. एक उत्तम भेटीचे समाधान मिळते. ‘माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक : वाचलेली पुस्तके; दोन : भेटलेली माणसे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com