परवा माझ्या वाढदिवसाला आम्ही महाडच्या गणपतीला गेलो होतो. छान दर्शन झालं. दर्शनानंतर आजूबाजूच्या परिसरात फिरलो आणि मी लहानपणी पहिल्यांदा अष्टविनायक यात्रेला गेले, ती पूर्ण यात्रा आठवली. असं म्हणतात, की देवदर्शनाला जाताना देव परीक्षा बघत असतो आपली.. पण आमची पूर्ण यात्राच एक कठीण परीक्षा होती.