Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Juice For Diabetes : मधुमेह झालेल्या व्यक्तीला जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते.
Juice For Diabetes
Juice For Diabetesesakal

Juice For Diabetes : आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील काही वर्षांपासून भारतात मधुमेहाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

मधुमेह झालेल्या व्यक्तीला जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. कारण, एखाद्या चुकीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे, तुमचे आरोग्य बिघडू शकते. मधुमेहाच्या रूग्णांना खाण्यापिण्यामध्ये अनेक पथ्ये पाळावी लागतात. जेणेकरून त्यांची रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकेल.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ज्यूसबद्दल सांगणार आहोत. ज्या ज्यूसचा तुम्ही आहारात समावेश केल्यास तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकेल. कोणते आहेत ते ज्यूस? चला तर मग जाणून घेऊयात.

Juice For Diabetes
Summer Hydrating Drink : उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्या काकडी-पुदिन्याचे हायड्रेटिंग ड्रिंक, वाचा सोपी रेसिपी

कोरफड ज्यूस

कोरफड आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि अनेक महत्वाच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. हे सर्व घटक रक्तातील साखरेची पातळी वेगाने नियंत्रित करण्यास मदत करतात.

त्यामुळे, कोरफडचा ज्यूस मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतो. या ज्यूसचे दररोज सेवन केल्याने वजन देखील कमी होते. एवढेच नव्हे तर कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. (Aloevera juice)

कारल्याचा ज्यूस

कडू कारले खायला अनेकांना आवडत नाही. परंतु, कारले हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारल्याचा ज्यूस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारल्यामध्ये इन्सुलिन, पॉलिपेप्टाईड-पी इत्यादी पोषकघटक आढळतात, जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. (bitter gourd juice)

पालकचा ज्यूस

पालक ही हिरवी पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्याचा आहारात समावेश केला जातो. व्हिटॅमिन्स, अमिनो अ‍ॅसिडसह इतर पोषकघटकांनी समृद्ध असलेल्या पालकचा ज्यूस मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर आहे.

पालकचा ज्यूस प्यायल्याने टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो आणि लठ्ठपणापासूनही आराम मिळतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी देखील हा ज्यूस लाभदायी आहे. (Spinach Juice)

Juice For Diabetes
Beetroot Juice : आरोग्यासाठी फायदेशीर आहे बीटरुटचा ज्यूस, पण 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये, कारण...

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com