Kartiki Ekadashi 2023 : भगवंतांनी भक्तावर आलेला चोरीचा आळ खोटा ठरवला अन् विठ्ठल मंदिरातला गरूड खांब अमर झाला

लोक पुरंदरदासांवर आळ घेत होते तेवढ्यात भगवंतांचा साक्षात्कार झाला अन्...
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023 esakal

Kartiki Ekadashi 2023 :

वारकऱ्यांसाठी वर्षातील चार एकादशी महत्त्वाच्या असतात. चैत्र, आषाढ,कार्तिक आणि माघ वारी या चारही वेळी वारकऱ्यांची जत्रा पंढरपुरात भरते. आज कार्तिक एकादशी आहे. आजच्या दिवशी पंढरपुरच्या विठ्ठलाची सालंकृत पूजा बांधली जाते. भगवंतांची महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना असतो. कार्तिकी वारीसाठी वारकरी मोठी गर्दी करतात.

कार्तिक शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात मोठी यात्रा भरते. कार्तिक शुद्ध एकादशीला उत्थान एकादशी असेही म्हणतात. या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले देव आजच्या दिवशी उठतात. स्कंद पुराणांमध्येही ब्रह्मदेव आणि नारदमुनी यांच्या संवादामध्ये या उत्थान एकादशीचे महात्म्य सांगितलेले आहे.

भगवंताची भक्त परंपरा महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत नाही. कर्नाटकातील विठ्ठल संत परंपरेतील प्रमुख संत आहेत. त्यापैकीच एक संत होते संत पुरंदरदास. पुरंदरदासांचा काळ इ. स. १४८४ ते १५६४ हा होता. यांचा जन्म महाराष्ट्रात, पुण्यापासून जवळच असलेल्या पुरंदर गडावर झाला, असे म्हणतात. पण काही पंडितांच्या मते, कर्नाटकात बेलारी जिल्ह्यात हंपीजवळ जे पुरंदरगड नामक गाव आहे, तेच यांचे जन्मस्थान होय. वांचे पिता वरदप्पा नायक हे मोठे सराफ होते.

Kartiki Ekadashi 2023
Jalgaon News : सोनाळ्याच्या भूमिपुत्राने अमेरिकेत साकारले विठ्ठल मंदिर! संस्थानतर्फे न्यू जर्सित विविध उपक्रम

हंपीजवळ कमलापूर येथे एक ताम्रपट मिळाला आहे, त्यावरून कळते की, ते वसिष्ठ गोत्री, यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मक्का किंवा कमलांबा असे होते. तिरुपती येथील नावावरून श्रीनिवास किंवा तिरुमलैयप्पा असे नाव ठेवले. त्याला तिम्मप्पा किंवा शिवप्पा असेही म्हणत.

लहानपणीच विद्वान आचार्यांजवळ तिम्मप्पाचे संस्कृत व कन्नड या भाषांचे उत्तम अध्ययन झाले. त्यांनी संगीताचेही शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी तिम्मप्पाचे लग्न सरस्वती नामक एका सुशील मुलीशी झाले. या दंपतीला चार पुत्र व एक कन्या अशी पाच अपत्ये झाली. पुत्रांची नावे वरदप्पा. गुरुअप्पा, अभिनवप्पा आणि मध्वप्पा अशी होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर तिम्मप्पाने त्यांचा सराफीचा व्यवसाय स्वतःच्या हुशारीने खूप वाढवला. विजयनगरसम्राट कृष्णदेवराय यांच्या दरबारात त्यांना फार मान होता. याच पुरंदरदासांनी विष्णूभक्तीत लीन होऊन भारतभ्रमणही केले.  भारतातील अनेक मंदिरे, देवी देवता यांच्यावर पदे रचली. पंढरपूर क्षेत्रीही त्यांनी दीर्घ काळ वास्तव्य केले. तिथे असताना त्यांच्यावर एक अत्यंत दुर्घर प्रसंग ओढवला होता. अशी एक कथा सांगितली जाते की-

Kartiki Ekadashi 2023
Panchang 13 August: आज एकादशी वारणा प्रदोष, जाणून घ्या आजचे पंचांग अन् मुहूर्त

पंढरपुरात एक नर्तकी होती. ती विठ्ठलाची एकनिष्ठ भक्त होती. एके दिवशी पुरंदरदासाचे रूप घेऊन पांडुरंग त्या दासीच्या घरी गेले व त्याने तिचे नृत्य-गायन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तिनेही अत्यंत भक्तिभावाने त्याची ती इच्छा पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न होऊन देवाने आपल्या हातातले एक अमोल कांकण तिना दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी देवाच्या हातातले कंकण नाहीसे झाल्याचे पुजाऱ्यांना कळले व त्याची शोधाशोध सुरू झाली. शेवटी ते कांकण त्या नर्तकीजवळ सापडले 'पुरंदरदासांनी ते आपल्याला दिले' असे तिने पुजाऱ्यांना सांगितले. त्यांनी लगेच पुरंदरदासांना पकडून देवळात नेले आणि एका खांबाला बांधून यथेच्छ मारले. इतक्यात गाभाऱ्यातून देववाणी ऐकू आली की, 'मीच पुरंदरदासाच्या वेषाने जाऊन ते कांकण दासीला दिले होते. तुम्ही पुरंदरदासाला सोडा व त्याला ज्या खांबाला बांधले त्याची पूजा करा.

Kartiki Ekadashi 2023
कार्तिकी दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस बंद राहणार विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन !

' मग पुजाऱ्यांनी पुरंदरदासांना सोडून त्यांची क्षमा मागितली व त्यांची मूर्ती त्या स्तंभावर कोरली. तो स्तंभ 'दासर स्तंभ' म्हणून आजही प्रसिद्ध आहे. भक्तजन पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी प्रथम त्याला वंदन करतात. त्यालाच 'गरुडस्तंभ' किंवा 'पुरंदरदास स्तंभ' असेही म्हणतात.

आयुष्याच्या अखेरचे दिवस पुरंदरदासांनी हंपी येथे ईशसेवेत घालवले व शेवटी तिथेच देह ठेवला. पुरंदरदासांनी कन्नड भाषेत विपुल काव्यरचना केली. आत्मशुद्धी, आत्मोद्धार व त्याचबरोबर सर्वांचा उद्धार हे त्यांनी जीवनाचे उद्दिष्ट मानले होते. यासाठी साधन म्हणून त्यांनी परमेश्वराची अनन्यभक्ती उपदेशिली, त्यांच्या काव्यांत त्यांची निस्सीम भक्ती, उत्कट प्रेम व ईश्वराच्या दर्शनाची आत्यंतिक तळमळ या गोष्टी सर्वत्र दिसून येतात.

(संबंधित माहिती लोकनाथ स्वामी यांनी भूवैकुण्ठ पंढरपूर या पुस्तकातून घेण्यात आली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com