Karwa Chauth: माझ्या केसात गजरा...करवा चौथला करा या हेअरस्टाईल

या टिप्स आणि स्टाइल करा फॉलो
gajra hairstyle
gajra hairstyleesakal
Summary

गजरा हा नेहमीच महिलांचा आवडता राहिला आहे.

सुवासिनी महिला करवा चौथला पतीला दिर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. बहुतेक स्त्रिया या दिवशी साडी, बॅंगल्स, ज्वेलरी घालण्यासाठी तयारी केल्याही असतील. आता फक्त त्यांना 24 ऑक्टोबर रोजी तयार आणि सजायचे असेल. पण हे कामही काही सोपे नाही. तुम्हाला हेअरस्टाईल, मेकअपपासून ते कॉम्पलिमेंटपर्यंत तुमच्या लुकला परफेक्ट लूक मिळावा यासाठी जेणेकरून तुम्ही हा करवा चौथला सर्वात खास आणि आकर्षक दिसाल. करवा चौथला बहुतेक स्त्रिया एथनिक कपडे घालतात. पारंपारिक कपड्यांसह हेअरस्टाइल योग्य नसल्यास लूक अपूर्ण दिसतो. करवा चौथदिवशी केसांना गजरा लावल्याशिवाय हा दिवस पूर्ण होणार नाही. त्याच वेळी, एथनिक लूक गजराशिवाय पूर्ण होणार नाही. गजरा हा नेहमीच महिलांचा आवडता राहिला आहे. जर तुम्हाला या करवा चौथला आपल्या केसांमध्ये गजरा लावायचा असेल तर आम्ही येथे काही गजरांच्या स्टाइल्सबद्दल सांगणार आहोत.

gajra hairstyle
Karwa Chauth : सुनेला खुश करण्यासाठी सासू देऊ शकते 'हे' गिफ्ट

गुलाब गजरा

आजकाल मुली आपल्या केसांमध्ये कानाच्या मागे दोन फुले सजवून ट्रेंडी लुक घेतात. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गुलाबाची फुले लावू शकता. यासाठी मीडियम हाय बन बनवा. आता कनेक्शनमध्ये इंग्लिश गुलाब ठेवा. तुम्ही तुमचे केस एका गुलाबाच्या फुलांनी किंवा अनेक फुलांनी सजवू शकता. जर तुम्हाला इंग्लिश गुलाबाची फुले मिळत नसेल तर आर्टिफिशियल गुलाबाची फुले वापरा पण देशी गुलाबाची फुले लावू नका.

सिंपल गजरा लूक

सिंपल गजरा तुम्हाला डिफरेंट लूक देतो. हे करण्यासाठी, अर्धे केस मोकळे सोडा आणि बाकी केसांना बांधून ठेवा. नंतर त्यात पातळ गजरा टाका. तुम्ही मोकळ्या केसांना सैल केस कर्ल करू शकता.

gajra hairstyle
Karwa Chauth 2021 : तुमच्या पत्नीला हमखास आवडेल असे गिफ्ट द्या

मल्टी लेयर गजरा लूक

गजराच्या या स्टाईलमुळे तुमचे केस अधिक सुंदर दिसतात. तुम्ही खुल्या केसांमध्ये मल्टी लेयर गजरा बनवू शकता. यासाठी केस मधून वेगळे करा आणि दोन्ही बाजूंनी पफ बनवा. मग क्राउन हेडवर एक पफ बनवा आणि केस हाफ पिनअप करा. पफच्या खालच्या बाजूपासून, तुम्ही दोन गजरांचे लेयर पिनअप करा.

जाल वर्क गजरा

जाल वर्क गजरा ही गजरा स्टाइलची लेहेंगा किंवा साडी कोणत्याही पारंपारिक आउटफिटवर सुंदर दिसेल. ते बनवणेही सोपे आहे. बाजारात तुम्हाला जाल वर्क गजरा मिळेल. ते लावण्यासाठी, पहिला साधे कनेक्ट (बुचडा) बनवा. मग जाल वर्क गजरा त्यावर लावताना हेअर पिनने चांगले फिक्स करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com