Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवूनही मळलेली कणीक काळी पडते, अशी करा स्टोअर, 2 दिवसानंतरही पोळी बनेल फ्रेश l keep atta dough fresh for long time 2 days in freeze follow easy tips it wont be black or spoil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitchen Tips

Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवूनही मळलेली कणीक काळी पडते, अशी करा स्टोअर, 2 दिवसानंतरही पोळी बनेल फ्रेश

Kitchen Tips : धावपळीच्या आयुष्यात सकाळी सकाळी जायला उशीर होऊ नये म्हणून बऱ्याच तरुणी सकाळच्या स्वयंपाकाची अर्धी तयारी रात्रीच करून ठेवतात. भाजी चिरून ठेवणे, कणीक मळून ठेवणे यांसारखी कामे स्त्रिया रात्रीच करून ठेवतात. अनेकदा कणीक जास्त मळल्या गेली की ती फ्रिजमध्ये स्टोअर करण्याची वेळ येते. मात्र फ्रिजमध्ये मळलेली कणीक स्टोअर करण्याची योग्य पद्धतही माहिती असायला हवी. नाहीतर कणीक काळी ठणठणीत पडते आणि कडकही होते.

फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तुमचीही कणीक काळी पडत असेल किंवा कडक पडत असेल तर या काही सोप्या टिप्स तुम्ही वापरा. या टिप्स वापरून अगदी दोन दिवसही तुमची कणीक अगदी फ्रेश राहील. आणि या कणकीची पोळीसुद्धा फ्रेश होईल.

या टिप्स वापरा

कणीक मळताना घाला थोडे मीठ

तुम्हाला कणीक मळून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवायची असेल तर त्यात थोड्या प्रमाणात मीठ घाला. मिठाने मायक्रोबॅक्टेरीया वाढण्याची गती मंदावते व कंट्रोलमध्ये राहाते. ज्यामुळे कणीक दीर्घकाळापर्यंत टिकून राहाते आणि काळीसुद्धा पडत नाही.

कणीक मळण्यासाठी हलकं कोमट पाणी वापरा

कणकीत मीठ टाकण्याव्यतिरीक्त कणीक मळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. कणीक सॉफ्ट ठेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही गरम पाण्याऐवजी दूधाचाही वापर करू शकता. कणकीमध्ये थंड पाणी तेव्हाच मिसळा जेव्हा तुम्हाला लगेच चपात्या बनवायच्या असेल. थंड्या किंवा रेग्युलर पाण्याने काही वेळातच कणीक कडक येते.

कणीक मळल्यानंतर त्याला वरून तेल किंवा तूप लावा

कणीक मळून झाली की त्याला वरून तेल किंवा तूप लावून त्याला फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा. याने तुमची कणीक काळी पडणार नाही आणि दोन दिवसानंतरही पोळ्या अगदी फ्रेश बनतील. (Food)

कणीक एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर करा

बहुतेक लोक कुठल्याही भांड्याच कणीक ठेवून त्याला फ्रिजमध्ये ठेवतात. याच कारणाने कणीक लवकर काळी पडते. अशा वेळी तुम्हाला ती कणीक काळी पडल्याने किंवा कडक आल्याने फेकावी लागू शकते. तेव्हा कणीक अगदी एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. नेमकी उरलेली कणीक अल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवायला हवी. (Kitchen Hacks)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह यास पाठिंबा देत नाही.