Monsoon Hair Care
Monsoon Hair Caresakal

Monsoon Hair Care : पावसाळ्यात हेअर स्पा करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा..

पावसाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरुन या ऋतूत हेअर स्पा केल्याने केस खराब होणार नाहीत.
Published on

पावसाळ्यात त्वचेची काळजी सर्वात महत्त्वाची असली तरी केसांचीही काळजी घेतली पाहिजे, कारण या ऋतूमध्ये केसांशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. या ऋतूमध्ये केस तुटण्याची समस्या उद्भवते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला हेअर स्पाची मदत घेतात. पण, पावसाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरुन या ऋतूत हेअर स्पा केल्याने केस खराब होणार नाहीत.

हेअर स्पा करण्यापूर्वी या गोष्टी करू नका

हेअर स्पा करण्यापूर्वी 24 तास आधी कोणतेही तेल किंवा हेअर मास्क वापरू नका. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल किंवा हेअर मास्क वापरले असेल तर ही माहिती हेअर स्पा सेंटरच्या एक्सपर्टला नक्की कळवा जेणेकरून केसांना कोणतीही हानी होणार नाही. हेअर स्पा करताना कोणत्याही प्रकारच्या गोष्टी केसांवर लावू नका.

Monsoon Hair Care
Hair Care: केसांना रात्रभर तेल लावणे धोक्याचेच, केसांच्या समस्या अधिकच वाढतील

हेअर स्पा केल्यानंतर या गोष्टी करू नका

हेअर स्पा करण्यापूर्वी आपले केस झाकून ठेवा आणि तज्ञांच्या मदतीशिवाय कोणत्याही गोष्टी किंवा घरगुती उपाय ट्राय करू नका. स्पा नंतर केसांवर हीटिंग टूल्स वापरू नका. असे केल्याने केसांशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात.

तुम्ही महिन्यातून दोनदा हेअर स्पा करू शकता

पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी हेअर स्पा करणे ठीक आहे, परंतु तुम्ही महिन्यातून दोनदाच हेअर स्पा करू शकता.

याकडेही विशेष लक्ष द्या

हेअर स्पासाठी चांगले सेंटर निवडा आणि हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही ज्या स्पा सेंटर मध्ये जाल ते पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे.

केसांवर ओलाव्यामुळे काय परिणाम होतो?

केस हवेतील जास्त आर्द्रता शोषून घेतात, ज्यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. घाम आणि हवेतील आर्द्रतेमुळे टाळू तेलकट, चिकट बनते. केसातील कोड्यांमुळे टाळूवर मुरुम आणि इतर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. पावसाच्या पाण्यात प्रदूषक आणि अम्लीय घटक असतात, जे केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात, ज्यामुळे केस कोरडे होतात.

Chitra kode:
Marathi News Esakal
www.esakal.com