esakal | केरळातील विद्यार्थांचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं यात काय आहे खास
sakal

बोलून बातमी शोधा

केरळातील विद्यार्थांचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं यात काय आहे खास

...म्हणून केरळमधील मेडिकल स्टुडंटचा व्हिडीओ होतो व्हायरल

केरळातील विद्यार्थांचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं यात काय आहे खास

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेकांना संगीताची किंवा डान्स करण्याची आवड असते. त्यामुळे असे कलाप्रेमी बऱ्याचदा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असतात. यात सध्याचा काळ सोशल मीडियाचा असल्यामुळे अनेक जण त्यांच्या डान्सचे व्हिडीओ इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर करत असतात. यातले काही तुफान व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका केरळमधील मेडिकल स्टुडंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या विशेष म्हणजे हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

केरळमधील एका मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये हे विद्यार्थी बोनी एम च्या Rasputin या गाण्यावर भन्नाट डान्स करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा अनोखा अंदाज पाहून हा व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये  केरळच्या थ्रिसर मेडिकल कॉलेजचे नवीन रझाक आणि जानकी ओमकुमार हे विद्यार्थी दिसून येत आहेत. या दोघांनाही नृत्याची विशेष आवड आहे.  त्यामुळे अनेकदा ते त्यांच्या डान्सचे असे व्हिडीओ तयार करत असतात. सध्या त्यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
 

loading image