- सुप्रिया शिंदे-महिंद्रकर
स्वयंपाकघर हे विज्ञानाची एक जणू प्रयोगशाळाच आहे. इथं पदार्थ फक्त बनत नाहीत, तर त्यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आणि जीवशास्त्राचे अद्भुत प्रयोग घडतात. आपल्या स्वयंपाकघरात रोज घडणाऱ्या या छोट्या वैज्ञानिक चमत्कारांना आपण कदाचित गृहीत धरतो, पण त्यामागचं विज्ञान जाणून घेतलं, तर स्वयंपाक करणं आणखी मजेशीर होऊन जातं.