Kitchen Tips : 2 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; फक्त फॉलो करा या टिप्स

जळलेली भांडी पटकन साफ करण्यासाठी सोप्या टिप्स
Kitchen Tips : 2 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; फक्त फॉलो करा या टिप्स

स्वयंपाक करताना एकावेळी अनेक गोष्टी महिलांना सांभाळाव्या लागतात. कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे स्वयंपाकघरात अन्न शिजवताना आपली भांडी जळतात. यामुळे तुमच्या जेवणाची चव तर खराब होतेच, शिवाय ही जळलेली भांडी साफ करणेही कठीण होते.

अशा करपलेल्या भांड्याला साफ करणं कठीण होऊन जाते. त्यामुळे आज आपण अशाच काही सोप्या टीप्स पाहणार आहोत. ज्या काही मिनिटांमध्ये या भांड्यांची चमक आहे तशी ठेवायला मदत करतील.

मिठाचा वापर

एखाद्या करपलेल्या किंवा जळलेल्या भांड्याला साफ करण्यासाठी मीठ एक प्रभावी साधन आहे. मीठामुळे अशी भांडी लवकर साफ होतात. यासाठी एका स्क्रब पेपरवर थोडं मीठ घ्या आणि आपल्या डिश साबणने ते साफ करा. ही आयडिया यावर प्रभावीपणे काम करेल. तुमचं करपलेल भांड काही मिनिटांत साफ होऊन जाईल.

कोकचा वापर करा

करपलेल्या भांड्याला साफ करण्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचे सॉफ्ट ड्रिंक. यासाठी तुम्ही कोकचा वापर करु शकता. एका भांड्यामध्ये कोक टाकून त्याला थोडे गरम होऊ द्या.

यामधून बुडबुडे निघणे बंद झाले की त्याला गॅसवरून खाली उतरवून प्लास्टिक ब्रश किंवा स्क्रबने घासू शकता. ही ट्रिक फक्त ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठीच नाही तर स्टीलच्या भांड्यांसाठी उपयोगी पडते.

Kitchen Tips : 2 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; फक्त फॉलो करा या टिप्स
Kitchen Hacks: आता दूध उतू जाणार नाही; फक्त ट्राय करा या ट्रिक्स

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर केल्यास तुम्ही हे सहजतेने करू शकता. यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा. या पेस्टला जळलेल्या भांड्यासोबत 15 मिनिटे पाण्यात भिजू द्या. पंधरा मिनिटानंतर या भांड्यांना स्वच्छ धुवून टाका.

टोमॅटो केचप

जळलेल्या स्टीलच्या भांड्याला टोमॅटो सॉसने काही मिनिटांत स्वच्छ केले जाऊ शकते. यासाठी टोमॅटोचा सॉस त्या जळलेल्या भांड्यावर लावा. रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठून स्क्रबच्या साह्याने हे भांडे साफ करा. तुम्ही पाहू शकता तुमचं भांड हे चमकत असेल आणि याचे डागही निघून जातील.

लिंबूचा रस

सफाईच्या बाबतीत लिंबूला खूप महत्त्व दिलं जातं. अनेक डिशवॉशमध्ये लिंबूचा वापर केलेला असतो. भांडी स्वच्छ करण्यासाठी किंवा कपड्यांवर असलेले डाग कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.

तसेच भांड्यांवर असलेले निशान किंवा डाग साफ करण्यासाठीही लिंबूच्या रसाचा फायदा होतो. भांड ज्या ठिकाणी जळले आहे, त्या ठिकाणी तुम्ही लिंबू घासू शकता. काही वेळानंतर तुम्हाला ते भांडण चमकल्याचे दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com