Kitchen Tips: डब्यातील भाजी बॅगमध्ये सांडते? 'या' ट्रिक्स वापरुन पाहा

अनेकवेळा रस्सा असेलली भाजी टीफिनमध्ये भरली की कालांतराने त्यातील रस्सा बाहेर पडतो अन् टीफीन गळायला लागतो
Kitchen tips How to Pack a Leakproof Lunch Box dro95
Kitchen tips How to Pack a Leakproof Lunch Box dro95

ऑफिस, कॉलेज आणि शाळेत जाणाऱ्यांचा जेवणाचा डबा भरताना गृहिणींना एकच भिती असते ती म्हणजे डबा गळण्याची. अनेकवेळा रस्सा असेलली भाजी टीफिनमध्ये भरली की कालांतराने त्यातील रस्सा बाहेर पडतो अन् टीफीन गळायला लागतो. यामुळे अनेकांची पुस्तके, कागदपत्रे, डायरी आणि लॅपटॉपसह अनेक गोष्टी खराब होतात.

तुम्हालाही हा अनुभव आला असेल. म्हणुनच आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळं तुमचा टीफिन पुन्हा गळणार नाही. (Kitchen tips How to Pack a Leakproof Lunch Box )

Kitchen tips How to Pack a Leakproof Lunch Box dro95
Kitchen Tips: किचनमधल्या चाकूची धार गेलीय, करा मग 'हे' उपाय

मुलांसाठी किंवा घरातील जॉब करणाऱ्या मंडळींसाठी डबा देताना स्टीलचा न देता एअरटाइट आणि लीक-प्रूफ डबा वापरा.

सिलिकॉन सील असलेल्या डब्याचा वापर करा. सिलिकॉन सील असलेले डबे हे विशेषतः गळती टाळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

डबा ठेवण्यापूर्वी अन्न पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम अन्न पॅक केल्यावर वाफेमुळे डबा देखील गळू शकतो.

Kitchen tips How to Pack a Leakproof Lunch Box dro95
Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

टिफिनमध्ये कोणताही पदार्थ भरलात की डब्याला क्लिंग रॅपने झाकून ठेवा. त्यामुळे गळती होण्याची शक्यता कमी होईल आणि डब्याचे झाकणही घट्ट राहील.

टीफिनमध्ये भाज्या किंवा कडधान्ये भरताना, त्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. जास्त अन्न भरू नका, अन्यथा झाकण नीट बंद होणार नाही आणि गळतीची समस्या निर्माण होईल.

टिफिन बॅग घेताना काळजी घ्या आणि अशी पिशवी खरेदी करा ज्यामध्ये तुमचा टीफिन स्थिर राहिल.

टिफिन सोबत रिसेल करण्यायोग्य प्लास्टिक पिशवी ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com