लिव्ह ‘इन', मॅरेज ‘आऊट'?

live in relationship
live in relationshipe sakal
Updated on

लिव्ह-इन रिलेशनशिप (live in relationship) अर्थातच आपसांत सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा पर्याय आजच्या युवकांना योग्य वाटत आहे. करिअरकडे फोकस आणि आपल्या मतानुसार जगण्याचे स्वातंत्र्य यात मिळत असल्यामुळे हायटेक तरुण-तरुणींपासून ते चाळीशीच्या वर गेलेल्या नागरिकांमध्येही लिव्ह इनचे आकर्षण आहे. पारंपरिक लग्नसंस्था आणि लिव्ह इन याविषयी ‘सकाळ'ने जाणून घेतलेली मते. (know about live in relationship)

live in relationship
पहिल्यांदाच डेटवर जाणाऱ्या मुलींनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी

लिव्ह इन

  • नैतिकतेची अधोगती

  • कायदेशीर स्थिती नाही

  • वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क नाही

  • समाजातील नैतिक मूल्यांचे अधःपतन

लग्नसंस्था

  • सामाजिक व नैतिक मान्यता

  • कायद्याचे संपूर्ण संरक्षण

  • वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क

  • अनैतिक प्रकारांना आळा

  • लिव्ह इनचे फायदे

  • स्वतंत्र राहून स्वातंत्र्याचा उपभोग

  • दोन मने जुळण्यावर भर

  • कोणावरही जबाबदारीचे ओझे नाही

जबाबदारी, कर्तव्याकडे दुर्लक्ष - लिव्ह इनमुळे भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृतीत फरक नसल्याची भावना येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण होवू शकते. लग्नसंस्थेतील महत्त्वाच्या असलेल्या जबाबदारी आणि कर्तव्याकडे लिव्ह इनमध्ये दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढे चालून नैराश्य, नात्यावर विश्वास नसणे, मुलांवर वाईट परिणाम होवू शकतात. लिव्ह इनमधून कायदेशीर मानले गेलेले मूल केवळ स्वतःची देखभाल तसेच वडिलांच्या स्वनिर्मित मालमत्तेत हक्काचा दावा करू शकते.
- डॉ. लिना लंगडे, प्राध्यापक, वंजारी लॉ कॉलेज, नागपूर
स्पेस आणि फ्रिडम मिळते - लिव्ह इनला पळवाट म्हणणे योग्य नाही. यामध्ये प्रत्येकाला पाहिजे असलेली स्पेस आणि फ्रिडम मिळते. आपले आयुष्य, करिअर मनाप्रमाणे घडविता येते. यासाठी सर्वप्रथम प्रेम की निव्वळ फिजिकल ॲट्रॅक्शन आहे हे जाणून घेतले पाहिजे. नात्यांची मर्यादा समजून घेतली तर अडचणी निर्माण होणार नाहीत.
-दिशा ठाकरे, विद्यार्थीनी, नागपूर
तरुणांसह नागरिकांचाही कल - तरुणांमध्ये तसेच उतारवयात लिव्ह इनमध्ये राहण्याची वृत्ती वाढली आहे. उतारवयात एखादा पार्टनर एक्सपायर झाला किंवा घटस्फोट झाला असेल तर किंवा इतर कारणांनी व आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर एक पुरुष व एक स्त्री लिव्हमध्ये राहण्याचा विचार करतात. याचा तोटा म्हणजे काही मुलं ते स्वीकारत नाहीत आणि प्रॉपर्टीच्या संदर्भात अडचणी वाढतात.
सविता जगताप, विद्यार्थीनी, नागपूर
कायदेशीर समस्या येतात - लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे. तरीही समाज त्याला मनापासून स्वीकारतो का हा प्रश्नच आहे. लिव्ह इनमध्ये अनेक कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक बाबींमध्ये दोघांत खटके उडू लागतात. समाजाचा पाठींबा मिळत नाही. अति सेल्फ रिस्पेक्ट व स्वातंत्र्यामुळे विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते. लिव्ह इनमधून क्राईमसुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
-डॉ. अमर मोंढे, नागपूर
जाणून घ्या, समजुतीने पाऊल उचला - मेट्रो सिटीमध्ये लिव्ह इनचे प्रमाण खूप वाढत आहे. कारण बाहेर राहणारी मुलं आपापल्या संसारात मग्न असतात. त्यांना आपल्या एकट्या असणाऱ्या आई किंवा वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अशावेळी लिव्ह इनमध्ये राहण्याचा विचार केला जातो. यासाठी कोणतीही कायदेशीर अडचण नाही. लिव्ह-इन रिलेशनपूर्वी आपल्या पार्टनरचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. मैत्रीच्या रूपात वेळ घालवावा आणि नंतर जुळत असल्यास पुढचं पाऊल उचलावं.
-सूरज दहिकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com