पुण्यात इथे मिळतील सर्वात स्वस्त Mobile Accesories.. एक फेरफटका नक्की मारा

आज आम्ही तुम्हाला पुण्यातील असे काही मार्केट आणि जागा सांगणार आहोत. जिथे तुम्हाला मोबाईलच्या सर्व एक्सेसरीज अगदी कमी किमतीत उपलब्ध होतील
पुण्यातली मोबाईल मार्केट
पुण्यातली मोबाईल मार्केटEsakal

मोबाईल सध्या आपणा सर्वांची जीवनावश्यक वस्तू ठरतेय असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या जीवाभावाच्या व्यक्तीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे आपण आपला मोबाईल Mobile जपत असतो. Know about Mobile Cheap Markets in Pune

कारण या मोबाईलमुळेच सध्या जीवाभावाच्या व्यक्तीशी बोलणं त्यांना पाहणं एकंदरचं त्यांच्या संपर्कात राहणं शक्य झालं आहे. त्यामुळे मोबाईलची काळजी Mobile Care घेणं हे तर गरजेचं आहेत. ज्याप्रमाणे आपण स्वत:च घर सजवतो त्यात लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी घेतो. तसचं मोबाईल म्हंटलं की त्याच्याशी निगडीत अनेक इतर वस्तूंची खरेदी Shopping आपण वरचेवर करत असतो.

यात खास करून मोबाईल Mobile सुंदर दिसण्याबरोबरच त्याच्या प्रोटेक्शन म्हणजेच सुरक्षेसाठी मोबाईल कव्हर विकत घेणं तसंच मोबाईलचं स्क्रिन गार्ड, मग गाणी ऐकण्यासाठी लागणारे हेडफोन्स, ईयरबड्स, मोबाईलचा चार्जर Mobile Charger, स्टॅण्ड, मोबाईलशी जोडता येणारे स्मार्ट वॉच अशा एक ना अनेक गोष्टींची आपण वरचेवर खरेदी करत असतो.

अनेकांना मोबाईल कायम आकर्षक दिसावा म्हणून मोबाईलच्या नवनवीन एक्सेसरीज घेण्याची आवड असते. अशावेळेला जर तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक व्हरायटीच्या सुंदर आणि तितक्याच स्वस्त मोबाईल एक्सेसरीज मिळाल्या तर?...

...होय यासाठीच आज आम्ही तुम्हाला पुण्यातील असे काही मार्केट आणि जागा सांगणार आहोत. जिथे तुम्हाला मोबाईलच्या सर्व एक्सेसरीज अगदी कमी किमतीत उपलब्ध होतील.

हे देखिल वाचा-

पुण्यातली मोबाईल मार्केट
Mobile Phone Use : मित्रांनो तुम्हीही एवढ्या मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघता? जडतील गंभीर आजार

तापकीर गल्ली, बुधवार पेठ- पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी म्हणजेच बुधवार पेठेत फिरत असताना तुम्हाला जर मोबाईलसाठी एखादी गरजेची वस्तू घ्यायची असेल तर बुधवार पेठेत असलेल्या तापकीर गल्लीत नक्कीच भेट द्या.

तापकीर गल्लीत असलेल्या समर्थ प्लाझामध्ये मोबाईल एक्सेसरीजची अनेक दुकान आहेत. इथं तुम्हाला मोबाईलच्या विविध अॅक्सेसरीज अगदी कमी किमतीत उपलब्ध होतील. याशिवाय जुना मोबाईल खरेदी करायचा असेल तरी तुम्ही या मार्केटला भेट देऊ शकता. याशिवाय मोबाईल रिपेअरिंगसाठी देखील तुम्हाला इतर कुठे जाण्याची आवश्यकता नाही.

हे देखिल वाचा-

पुण्यातली मोबाईल मार्केट
Battery Saving Tips: प्रवास करताना तुमच्याही Mobile ची बॅटरी लवकर उतरतेय, मग या ट्रीक्सने वाढवा battery backup

पिंपरी मोबाईल मार्केट- पिंपरी-चिंचवडवासियांना जर मोबाईल एक्सेसरीजच्या खरेदीसाठी पुण्यातील मार्केट गाठणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी पिंपरीतील पिंपरी कॉलनी शास्त्री नगर इथलं मोबाईल मार्केट हा देखील एक चांगला पर्याय आहे. इथं मोबाईलच्या दुकानांसोबतच मोबाईलसाठी लागणाऱ्या विविध एक्सेसरीज कमी किमतीत उपलब्ध होतील.

त्याचसोबत अर्जंट मोबाईल रिपेअरिंगही करुन मिळेल. इथल्या काही दुकांनांमध्ये जर तुम्ही फेरफटका मारलात तर काही महागडे मोबाईल अगदी कमी किमतीत तुम्हाला सहज उपलब्ध होतील. चांगल्या कंडिशनमध्ये आणि अवघे काही दिवस वापरण्यात आलेले आयफोन तुम्हाला जवळपास निम्म्या किमतीमध्ये इथे मिळतील.

जे. एम रोड- पुण्यातील डेक्कन परिसरातील जंगली महाराज रोड म्हणजेच JM रोडवर तुम्हाला मोबाईल एक्सेसरीजसाठी अनेक दुकानं आढळतील. इथं तुम्हाला मोबाईलच्या सर्वच प्रकारच्या एक्सेसरीजच्या नव्या व्हरायटी पाहायला मिळतील. शिवाय आयफोन सारखे फोन आणि स्मार्ट वॉचदेखील अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध होतील.

पुणे जुना बाजार- पुण्यातील जुना बाजार हा खरं तर आठवडी बाजार आहे. पुणे रेल्वे स्टेशनहून अगदी काही अंतरावर हा बाजार भरतो. दर बुधवारी आणि रविवारी हा बाजार भरतो. या बाजारात कपडे, बूट ते इलेक्ट्रोनिक वस्तू आणि मोबाईल एक्सेसरीजही स्वस्तात मिळतात. तुम्हाला इथे विविध स्टाइलचे हेडफोन्स तसचं मोबाईल कव्हर अगदी कमी किमतीत मिळतील.

अशा प्रकारे जर तुम्हाला मोबाईलसाठी एक्सेसरीज किंवा स्मार्ट वॉच अगदी कमी किमतीत खरेदी करायचं असेल तर पुण्यातील या मार्केटमध्ये एक फेरफटका नक्की मारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com