esakal | उन्हाळ्यातही असा करा परफेक्ट मेकअप, जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

बोलून बातमी शोधा

know How to do perfect makeup even in summer Marathi article}

उष्णता आणि घाम या दोन्हीमुळे चेहऱ्यावर कलेला मेकअप सगळीकडे पसरण्याच्या समस्येला सामोरे जावे लगते. उन्हाळ्यात परिपूर्ण मेकअप कसा करायचा जेणेकरून आपल्याला ताजेतवाने आणि सुंदर राहाण्यात मदत होईल  आज आपण या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

lifestyle
उन्हाळ्यातही असा करा परफेक्ट मेकअप, जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
sakal_logo
By
टीम ईसकाळ

नाशिक : उन्हाळा कोणालाच आवडत नाही, वाढलेलं तापमान आणि सतत येणारा घाम यामुळे सगळेच त्रस्त असतात.  मात्र आपल्याला सर्वात त्रास देणारी गोष्ट म्हणजे मेकअप होय. उष्णता आणि घाम या दोन्हीमुळे चेहऱ्यावर कलेला मेकअप सगळीकडे पसरण्याच्या समस्येला सामोरे जावे लगते. उन्हाळ्यात परिपूर्ण मेकअप कसा करायचा जेणेकरून आपल्याला ताजेतवाने आणि सुंदर राहाण्यात मदत होईल  आज आपण या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

 सनस्क्रीन नियमीत वापर करा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनस्क्रीन न वापरणे हे त्वचेसाठी खूप हानिकारक ठरते. आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या नियमामध्ये एसपीएफ 30 असलेली सनस्क्रीन वापरणे फायद्याचे ठरते.  घराबाहेर पडण्यापूर्वी ते फक्त चेहऱ्यावरच नव्हे तर गळा, हात आणि शरीराच्या प्रत्येक भागावर देखील सनस्क्रीन लावा, जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण करेल. तुम्ही आपल्या हँडबॅगमध्ये एक छोटी बाटली / ट्यूब ठेवू शकता.

वाटर बेस्ड लोशन वापरा

उन्हाळ्यात त्वचा मॉइस्चराइझ करण्यासाठी सौम्य, पाण्यावर आधारित मॉइस्चरायझर्स वापरा . हे आपली त्वचा मऊ ठेवेल. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर सर्वोत्तम आहे. मॉइश्चरायझर त्वचेद्वारे शोषले जाते, चिकट थर मागे ठेवत नाही. आपण तेल किंवा ग्लिसरीन आधारित बॉडी लोशन वापरल्यास मुरुमांच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

 जुने मेकअप साहित्य वापरणे टाळा

आमच्या सर्वांना आम्ही काही वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या  ब्लश किंवा लिपस्टिकची शेड आवडते म्हणून आपण जपून ठेवलेल्या असतात त्या डस्टबिनमध्ये फेकून द्या,  पण या उन्हाळ्यात आपले हृदय थोडे कठोर करा आणि कमीतकमी मेकअप उत्पादनांपासून मुक्तता मिळवा ज्यांची मुदत संपली आहे. असे खूप दिवसांपासून वापरत असलेले प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी हानीकारक ठरु शकतात. 

मेकअप करतान..

आपण आपल्या त्वचेच्या काळजीकडे लक्ष देत आहात, तेच मेकअपला लागू होते. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी तेल नसलेले मॉश्चरायझर वापरा. जर त्याच्याबरोबर तेल-मुक्त फाउंडेशन असेल तर आणखीणच उत्तम राहील. 

उत्पादनांची वॉटरप्रूफ व्हर्जन वापरा

घामामुळे मेकअप पसरणे ही उन्हाळ्याची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्याला हे टाळायचे असल्यास आपल्या आवडत्या मेकअप उत्पादनांची वॉटरप्रूफ प्रोडक्ट वापरा.