
नवी दिल्ली : आपलं भविष्य काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असतोच. येणारा दिवस कसा असेल, आपलं भविष्य कसं असेल? यांसारखे प्रश्न माणसाला शांत बसू देत नसतात. आपल्या भविष्याचा वेध घ्यावासा वाटणे, हे मानवी प्रवृत्तीचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. येणारं वर्ष आपल्या आयुष्यात काही सुखद बदल घडवून आणेल का की काहीतरी अघटीत घडून आयुष्याची घडी विस्कटेल, अशी शंका-कुशंका प्रत्येकाला सतावत असते. 2020 चे वर्ष तर बराच गोंधल घालणारे ठरले. कोरोना व्हायरसचे महासंकट अजून उतरता उतरले नाहीये. मात्र, येणारे 2021 वर्ष काही सुखद ठरेल की ते ही असेच नुकसानकारक ठरेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहणे साहजिक आहे.
जगभरात अनेक भविष्यवेत्ते यासंदर्भात भाष्य करत असतात. अनेकांची भविष्यवाणी खरीही ठरत असल्याचं बरेचदा आढळून येतं. ज्यांची भविष्यवाणी खरी ठरुन येते अशांपैकीच एक म्हणजे नॉस्ट्रॅडेमस होय. नॉस्ट्रॅडेमसच्या आधीच्या भविष्यवाण्यांवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की, त्याची भविष्यवाणी बऱ्यापैकी खरी ठरत आली आहे. आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढत आहे. त्यामुळे येणारे 2021 हे साल कसे असेल याचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचं आहे. नॉस्ट्रॅडेमसच्या नजरेतून 2021 हे साल कसे असणार आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
लेस प्रोफेटीस नावाच्या पुस्तकात केली भविष्यवाणी
नॉस्ट्रॅडेमसने लेस प्रोफेटीस नावाच्या एका पुस्तकात जगाशी निगडीत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1555 मध्ये आली होती. यामध्ये एकूण 6338 भविष्यवाण्या केल्या आहेत. यामधील जवळपास 70 टक्के भविष्यवाण्या या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्या छंदाच्या स्वरुपात या पुस्तकात आहेत, ज्यांना क्वाट्रेन या नावानी ओळखलं जातं. नॉस्ट्रॅडेमसने म्हटलं होतं की, 2021 च्या आसपास रशियन वैज्ञानिक असे हत्यार आणि व्हायरस बनवतील ज्यामुळे माणसाचे मोठे नुकसान होऊ शकते आणि माणसं झोम्बीसारखी होऊ शकतात.
सूर्यावर होईल मोठा स्फोट
नॉस्ट्रॅडेमसने म्हटलं होतं की, 2021 च्या आसपास सूर्यावर भयंकर विस्फोट होईल. या विस्फोटाच्या परिणामापासून पृथ्वी वाचू शकणार नाही. समृदाचा तळ वाढल्याने पृथ्वीचा एक मोठा भाग पाण्याखाली जाईल. पर्यावरणातील या बदलांमुळे युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. संसाधनांसाठी जगभरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तसेच लोक स्वत:च्या सुरक्षेसाठी धावाधाव करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.