Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स
Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स

Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स

जगभरात कोरियन महिला त्यांच्या स्लिम ट्रिम फिगरसाठी ओळखल्या जातात. यासाठी त्या योग्य नियोजन करतात. फक्त संतुलित आहारच घेतात. तसेच घरचे शिजवलेले अन्नही खातात. त्यांना चालणेही खूप आवडते. तिकडचे बहुतेक लोकं तंदुरूस्त आणि निरोगी आहेत. मग तो तरुण असो, मध्यमवयीन असो किंवा 70 वर्षांचा असो, प्रत्येकजण आरोग्याविषयी जागरूक असतो. विशेषतः कोरियन महिला त्यांच्या दिसण्याविषयी, आहाराविषयी फार जागरूक आहेत.

K Pop Diet

K Pop Diet

डाएटमध्ये आंबवलेल्या पदार्थांचा समावेश- कोरियन महिलांच्या जेवणात साईड डिश म्हणून आंबवलेल्या पदार्थांचा समावेेश असतो. असे आंबवलेले पदार्थ आतड्यांसाठी फायद्याचे असून त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच वजन कमी करायला मदत करतात.

meals in hotels

meals in hotels

संतुलित आहाराचे पालन- या महिला संतुलित आहाराचे पालन करतात. त्या काही खात नाहीत असे क्वचितच घडते. उलट त्यांच्या आहारात प्रथिनांपासून कर्बोदके, फॅट्स अशा घटकांचा समावेश असतो. हे लोक जास्त खाणे टाळतात आणि त्यांच्या दैनंदिन कामात शारीरिक हालचालींचा समावेश करतात.

fresh vegetables

fresh vegetables

आहारात भाज्यांचा अधिक समावेश- आपल्याकडे अनेक मुलं-मुली भाजी खायला उत्सुक नसतात. पण, कोरियन महिला भाजी खाण्यावर भर देतात. तुम्ही जर पारंपारिक कोरियन पदार्थ खाणार असाल तर तुम्हाला विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतील, बहुतेक भाज्या तंतुमय, आरोग्यदायी आणि कमी कॅलरी असलेल्या असतात. त्यात असलेल्या फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. म्हणून भाजी खाणे हे त्यांच्या सडपातळ अंगकाठीचे रहस्य आहे.

Sea Food

Sea Food

सी फूडचा समावेश- कोरियातील मुख्य खाद्यपदार्थांत सीफूडला अतिशय महत्व आहे. फॅटी माशांच्या व्यतिरिक्त, इथल्या स्त्रिया विविध माशांचे पदार्थ नेहमीच्या जेवणात करतात. समुद्र शेवाळ त्यांना आवडतं. त्यात जीवनसत्वे, खनिज आणि फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होते. तसेच पोट भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नसल्याने वजनही वाढत नाही.

meal

meal

घरचे जेवण पसंत- कोरियन महिला तंदुरुस्त राहण्यासाठी घरी शिजवलेले अन्न खाणे पसंत करते, फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढते, शिवाय आजार होण्याचा धोकाही वाढतो., वजन कमी करण्यासाठी घरगुती अन्नच योग्य असल्याचे त्यांचे मत आहे.

walking

walking

जास्तीत जास्त चाला- कोरियात बहुतेक लोक चालणे पसंत करतात. बाहेर कुठेही जायचे असेल कार, बस किंवा अन्य वाहन वापरण्याऐवजी पायी जाणे पसंत करतात. सक्रिय जीवनशैलीमुळे बहुतेक स्त्रिया त्यांचे वजन नियंत्रणात ठेवतात.त्यामुळे जर तुम्हालाही कोरियन महिलांप्रमाणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसायचे असेल, तर तुमच्या जीवनशैलीत त्यांचा आहार आणि एक्टीव्हिटिज नक्कीच वापरून पहा.

loading image
go to top