
Not Bathing In Winter Helps Keep The Skin Nourished: आजकाल सगळीकडे थंड हवामानामुळे सगळे हैराण झाले आहेत. शरीर ऊबदार राहावे म्हणून स्वेटर, मफलर, सॉक्स आणि जॅकेट याचा सगळे वापरही करतात. बरेच जण हिवाळ्यात दिवसभर ऊबदार वाटावे म्हणून दररोज न चुकता गरम पाण्याने आंघोळ ही करतात. पण बरेचजण कंटाळा करून यापासून दूर राहतात आणि त्यामुळे त्यांना सतत टोमणेही ऐकावे लागतात.
पण हिवाळ्यात आंघोळ करण्याचे प्रमाण कमी केले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते असे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात आंघोळ करण्याचे प्रमाण कमी केल्यास आपले आयुष्यमान वाढू शकते. त्यामुळे ज्यांना हिवाळ्यात आंघोळ करण्याचा कंटाळा आहे त्यांना आता चिंता करण्याचे काही कारण नाही.