- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपलं मन म्हणजे एक सतत चालणारं यंत्र. विचारांच्या हजारो लाटांनी व्यापलेलं. दर दिवशी सुमारे साठ हजार विचार आपल्या मनात येतात आणि जातात. यातील काही उपयोगी, काही हलकेफुलके, काही त्रासदायक आणि काही सतत परत येणारे.
आपण अनेकदा म्हणतो, ‘डोकं शांतच होत नाही.’ ‘काय करू, सतत विचार चालूच असतात.’ ‘विचार थांबतच नाहीत!’ अशी वाक्यं आपण अनेकदा बोलत असतो.