esakal | तुमची Leggings लवकर खराब होतेय? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

तुमची Leggings लवकर खराब होतेय? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

तुमची Leggings लवकर खराब होतेय? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सण कोणताही असो ड्रेस खरेदी करताना विचार होतो तो दुपट्टा आणि लेगिंन्सचा. यात मग खरेदी करताना कलरचा आणि ब्रॅन्डचा विचार जादा केला जातो. आजकल कुर्ती सोबत टिशर्टवर लेगिंन्स वापरण्याचा ट्रेंन्ड वाढला आहे. पण बऱ्याचदा कितीही महागडी लेगिंन्स घेतली तरी ती खराब होतेच. बऱ्याचदा कुर्ता आहे तसाच राहतो आणि लेगिंन्स खराब होते. कितीही महागडी लेगिंन्स घेतली तर ती खराब होणारच अशी मानसिकता होऊन जाते. पण थोडी काळजी घेतली तर तुमची लेगिंन्स खूप दिवस टिकेल आणि पैसे ही वाचतील. चला तर आज जाणून घेऊया लेगिंन्स कशी वापरावी.

लेगिंन्स सतत धुऊ नका

कपडे गरजेपेक्षा जास्त धुतली की ती लवकर खराब होतात. त्यांचा टिकाऊपणा कमी होतो. लेगिंन्सचे ही तसेच आहे. ती जादा धुतली गेली की लवकर खराब होते. म्हणून दोन ते तीन वेळा वापरूनच वाॅश करा. गरज असेल त्यावेळी ही तुम्ही वाॅश करू शकता.

लेगिंग्सला अशा पध्दतीने धुवा

कपडे वाॅश करताना ती नेमकी कोणत्या फॅब्रिकची आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. लेगिंन्स ही स्ट्रेचेबल असते. यात नायलॉन, काॅटन, स्पैन्डेक्स असे फॅब्रिक असते. त्यामुळे वाॅश करताना काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे खूप हार्ड वाॅश न करता डेलीकेट पध्दतीने वाॅश करा. जेणेकरून त्याची इलास्टिक खराब नाही होणार. लेगिंन्स शक्यतो वॉशिंग मशीनमध्ये न धुता हाताने धुवावी. ती उलटी करून धुवावी.

फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करू नका

लेगिंन्स वॉश करण्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करू नका. स्पैन्डेक्स, पॉलिस्टर अश्या कपड्यांना याचा वापर टाळा. फॅब्रिक सॉफ्टनरच्या एेवजी तुम्ही सिरका वापरू शकता. थंड पाणी आणि सिरक्यात अर्धा तास लेगिंन्स भिजत ठेवून वाॅश करू शकता.

लेगिंग्स सुखवण्याची योग्य पध्दत

लेगिंन्स वाॅश केल्यानंतर ती योग्य पध्दतीने सुखवणे गरजेचे आहे. लेगिंन्स कडक उन्हात वाळवू नका. याचबरोबर ड्रायरमध्ये ही वाळवू नका. ड्रायरच्या हिटने लेगिंन्स लवकर खराब होते. त्याला छिद्रे पडायला सुरवात होते. लेगिंन्सला हवेत वाळवण्यापेक्षा घरात वाळवू शकता.

loading image
go to top