- प्रिया ठाकूर, अभिनेत्री
आईचे प्रेम हे जगातील कुठल्याही गोष्टीसारखे नाही. ते शुद्ध, कायमस्वरूपी आणि नि:स्वार्थी असते. माझ्यासाठी माझी आई नेहमीच आधारस्तंभ, माझी भावनिक दिशादर्शक राहिली आहे. मला हरवल्यासारखे वाटते, तेव्हा मला ताकद देणारी व्यक्ती म्हणजे माझी आई आहे. जेव्हा मी माझ्याबद्दल विचार करते, तेव्हा मी तिच्याबद्दल अधिक विचार करत असते.