ग्रीन टी प्यायचा कंटाळा येतो? या पद्धतीने वाढवा चहाची चव

'ही' पद्धत वापरा अन् वाढवा ग्रीन टीची चव
Green Tea
Green TeaGreen Tea

चहाप्रेमींना कोणत्याही वेळी चहा द्या ते तितक्याच प्रेमाने तो घेतली. पण, चहाची आवड असण्यासोबतच जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने नक्कीच केली पाहिजे. खरं पाहायला गेलं तर आजकाल फिटनेस फ्रिक असलेले अनेक जण ग्रीन टी पिण्याला पसंती देतात. मात्र, अनेकदा या चहाची चव आवडत नसल्यामुळे नाक मुरडून तो प्यावा लागतो. म्हणूनच, नावडतीचा चहा आवडता करण्यासाठी त्याची चव कशी वाढवायची हे जाणून घेऊयात. (lifestyle-green-tea-tips-how-to-make-tasty-and-healthy-green-tea-ssj93)

ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण असतं. त्यामुळे नियमितपणे ग्रीन टी प्यायला तर कॅन्सरसारखे अनेक आजार दूर राहतात. तसंच रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. मधुमेह, वजन वाढणे या सारख्या तक्रारीदेखील कमी होण्यास मदत मिळते.

Green Tea
तुमचा व्हॅट्स अ‍ॅप DP कोण चोरुन पाहतंय माहितीये?

या पद्धतीने वाढवा ग्रीन टीची चव

१. अनेकदा आपण गरम पाण्यात ग्रीन टी ची बॅग बराच काळ तशीच ठेवतो. त्यामुळे या चहात कडवटपणा येतो. त्यामुळे ग्रीन टी गरम पाण्यात केवळ २-३ वेळा डीप करा आणि लगेच बाहेर काढा.

२. गरम पाणी मंद आचेवर उकळा. त्यानंतर गाळणीमध्ये १ चमचा ग्रीन टी पावडर टाकून त्यावर गरम पाणी ओता. त्यामुळेदेखील ग्रीन टीचा कडवटपणा येत नाही. तसंच ग्रीन टी कधीच पातेल्यात नॉर्मल चहासारखा उकळवू नका.

३. ग्रीन टीमध्ये मध आणि लिंबू टाकल्यावर त्याची चव वाढते.

४. किसलेलं आलं आणि काळी मिरी घालूनदेखील ग्रीन टी करता येतो.

५. वेलची घालून ग्रीन टी केला तर चहाला येणारा विशिष्ट वास येत नाही.

६.ग्रीन टीमध्ये कधीही साखर किंवा गुळ वापरु नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com