esakal | 'या' व्यक्तींसोबत मैत्री करणे ठरु शकते धोक्याचे
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship

एखाद्याशी मैत्री खूप काळजीपूर्वक करायला हवी.  कारण चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर दुःख मनात राहील.

'या' व्यक्तींसोबत मैत्री करणे ठरु शकते धोक्याचे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - मैत्री अस नात आहे, जिथे कधी हिम्मत मिळत, तर कधी हसण्याचे निमित्त मिळते. मात्र मैत्री अशा व्यक्तीबरोबर झाल्यास ज्याचे विचार, स्वभाव तुमच्याशी मिळते-जुळते नसेल तर हे सुंदरसे नाते डोकेदुखी आणि कोंडमाराचा विषय होऊन जाते. अशी स्थिती मैत्रीच्या सुरवातीला किंवा अनेक वर्षानंतरही येऊ शकते. तर चला जाणून घेऊ या पाच अशा राशींच्या व्यक्तींविषयी, त्यांनी आपसात मैत्री करु नये...

१. मेष आणि कर्क
मेष आणि कर्कच्या मधे सुरवातीला खूप चांगले पटते. ते गंभीर विषय एकमेकांना शेअर करु शकतात. मात्र थोडीशी अडचण जरी आली तर त्यांचे नाते वेगाने बिघडते. मेष राशीचे लोक जर एखादी गोष्ट खटकत असेल तर ते सरळ तोंडावर बोलून टाकतात. यावेळी त्यांचे शब्द मनाला लागतात. दुसरीकडे कर्क राशीचे लोक दुसऱ्यांच्या भावनांचा आदर ठेवतात. त्यामुळे ते बोलण्यापूर्वी त्याचा विचार करतात. अशा स्थितीत मेष राशीच्या व्यक्तीचे कडू शब्दामुळे ती दुखवतात.

२.वृष आणि मकर
या दोन राशींच्या मधे सुरवातीला ओढताण पाहायला मिळते. जर यांच्यात काही वाद झाला, तर ते मिटवणे अवघड होऊन जाते. या मागील कारण असे की दोघेही डोक्याने चालाख असतात. त्यामुळे त्यांना जे वाटेल तेच ते करतात. साॅरी बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. उलट मैत्रीच नात संपवण्याचा अधिक विचार करतात. या स्थितीत या दोघांची मैत्री नकारात्मकतेशिवाय आणखी काही नसते.

३.कन्या आणि मेष
कन्या राशी असलेले लोक आपल्या परिपूर्णतेसाठी ओळखले जातात. आपल्या आयुष्यावर कोणतेच नियंत्रण नसलेले लोक त्यांना आवडत नाहीत. मेष राशीवाले आपल्या मर्जीने वागणारे लोक असतात. त्यांना नवीन अनुभव घेणे, प्रयोग करणे आवडत असते. हे कन्या राशीवाले मुळीच आवडत नाही. यांच्या मधीलचे अंतर नाता आणखी कठीण बनवून टाकते.

४. तुला आणि वृश्चिक
तुला आणि वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये खूप चांगली मैत्री होऊ शकते. मात्र हे नाते टिकवून ठेवण्याची तऱ्हा फार वेगळी असते. एकीकडे तुला संतुलित आयुष्य जगतात. दुसरीकडे वृश्चिक नात्यांमध्ये आॅब्सेसिव्ह स्वभाव दाखवतात. हे दमछाकीचे कारण बनते. तुला राशीचे लोक आपल्याबरोबर दुसऱ्या एखाद्या मित्राला घेऊन जाण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हे वृश्चिकवाल्यांना पटत नाही.

५ सिंह आणि कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना फार नाटकी लोक आवडत नाहीत. नेमके सिंहवाले असेच असतात. त्यांना प्रत्येक गोष्टींत नाट्य, लक्ष वेधणे, मोहिनी आणि थाटमाट त्यांना आवडते. आपल्या अवती-भवती लोक कशी आहेत ही गोष्ट कुंभ राशींच्या लोकांसाठी महत्त्वाची बाब ठरते. त्यांच्याबरोबरच ती आपला वेळ व्यतीत करण्यास त्यांना आवडतात. अशा स्थितीत सिंहवाल्यांना हताळणे अवघड होऊन जाते.

संपादन - गणेश पिटेकर

loading image