esakal | कडुलिंबापासून बनवा फेसपॅक आणि चेहऱ्यावरील पोर्स करा कमी

बोलून बातमी शोधा

कडुलिंबापासून बनवा फेसपॅक आणि चेहऱ्यावरील पोर्स करा कमी

कडुलिंबापासून बनवा फेसपॅक आणि चेहऱ्यावरील पोर्स करा कमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद :चेहऱ्यावर खूप डाग झाल्यास तो व्यवस्थित दिसत नाही. तसेच त्वचेवर पोर्स खूप वाढले असतील तर ती टाईट दिसत नाही. तसेच त्वचेवर हवा तसा गोरेपणाही दिसत नाही. मोठे पोर्स असेल तर त्वचेवर छिद्रांसारखे दिसतात. अनेकदा यात मळ फसल्याने पिंपल्सची समस्या निर्माण होते. त्यामुळे जर मेकअप केल्यास चेहऱ्यावर चांगला बेस बनत नाही. यावर आम्ही तुम्हाला नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ते आहे कडूलिंबाचे फेस पॅक. तर चला बनवू या...

१.कडूलिंबाच्या मदतीने चेहरा असा करा स्वच्छ

लिंबाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्वतःचा चेहरा फेस वाॅशने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर लिंबाच्या पाण्याची वाफ घ्यायची आहे. ही खूप चांगली पद्धत आहे. याने तुमची क्लॅग्ड पोर्स बरे होतील. एक भांड घ्या. त्यात पाणी भरा आणि लिंबाचे पाणी उकळून घ्या. नंतर याच पाण्याची वाफ घ्यायची. जर तुमच्याकडे कडूलिंब नसेल तर तुम्ही तुळशीचा ही वापर करु शकता. दोन मिनिटे वाफ घेतल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या त्वचेच्या मोठे पोर्स खुले झाले आहे. नरम टाॅवेलने चेहरा पुसून घ्या. याने त्वचेतील मळ निघून जाईल.

२.त्वचा एक्सफोलिएशनसाठी चारकोल स्क्रब

वाफेनंतर चेहऱ्यावर माईल्ड एक्सफोलिएशन केले जाऊ शकते. लक्षात ठेवा तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास होत असेल तर एक्सफोलिएशन करु नका.

साहित्य

- एक चमचा चारकोल पावडर

- १ चमचा तांदुळाचे पीठ

- १/२ चमचे मध

- त्यात टाकण्यासाठी गुलाब जल

तुम्ही सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्याला कमी प्रेशरबरोबर स्क्रब करा. चेहरा स्क्रब करण्यानंतर तुम्ही ते थंड पाण्याने धुवून घ्या. लक्षात ठेवा की चारकोल संवेदनशील असते. तुम्हाला त्याविषयी माहीत नसेल. अशा वेळी ब्राऊन शुगर आणि मधाला थोड्याशा गुलाब जलमध्ये टाकून स्क्रब करा.

३.कडूलिंबाचा फेस पॅक

कडूलिंबाचा फेस पॅक त्वचेला टाईट करण्यात आणि पोर्सला छोटे करण्यात मदत करु शकते. यासाठी तुम्हाला डाय पॅक बनवायला लागणार आहे.

साहित्य

- एक चमचा कडूलिंबाचे पावडर ( वाळलेल्या कडूलिंबाचे पाने मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या किंवा बाजारातून रेडमेड विकत घ्या.)

- दोन चमचे अॅलाव्हेरा जेल

- थोडेसे गुलाब जल

हे सर्व एकत्र करुन तुम्हाला एक चांगली पेस्ट तयार करायचे आहे. ते चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांपर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही हे पॅक थंड पाण्याने धुवून टाका. हे पोर्स कमी करण्यात खूप मदत करु शकते. याने तुम्हाला चांगला फायदा मिळेल.